दिवाळीमध्ये LPG सिलेंडरचं होऊ शकतं ‘शॉर्टेज’, सौदी संकटाचे भारतावर परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदीमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे एलपीजी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. अगामी काळात सुरु होणाऱ्या सणासुदीच्या दिवसांतही ग्राहकांना एलपीजी गॅसच्या तुडवड्याला सामोरे जावे लागणार आहे.

भारतीय कंपन्या मागणी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात
इंडियन ऑईल कॉर्प., भारत पेट्रोलियम कॉर्प. आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या कंपन्या देशात एलपीजी सिलेंडरच्या कमतरतेमध्ये सुधारणा करण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत. इंडियन ऑइलचे चेअरमन संजीव चौहान यांनी सांगितले की, पुढील महिन्यात एलपीजीची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा कंपनीचा अनुमान आहे. ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या शिपमेंटला थोडासा उशीर होऊ शकतो त्यामुळे आम्ही अतिरिक्त एलपीजी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

एलपीजी आयात करण्यामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर
अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीने सांगितले की भारताला अतिरिक्त दोन एलपीजी शिपमेंट देण्याबाबत विचारणा केली आहे. यासंबंधीचे दोन कार्गो पुढील काही आठवड्यांमध्ये भारतात पोहचतील. भारत जगातील एलपीजी आयात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि आपल्या मागणीतील जवळजवळ अर्धा हिस्सा सौदी अरब, कतार, ओमान आणि कुवैत सारख्या विदेशी सप्लायरकडून मिळवतो.

पंतप्रधानांनी सुरु केलेल्या उज्ज्वला योजने अंतर्गत प्रत्येक गरीब व्यक्तीला एलपीजीचे कनेक्शन दिले जातात यामुळे देशात एलपीजीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

कसा झाला होता अरामकोच्या प्लांटवर हल्ला
सौदी अरेबियातील प्रसिद्ध तेल कंपनी अरामकोवर 14 सप्टेंबर रोजी ड्रोनने हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर कंपनी परिसरात भयानक आग लागली होती. इराण मधील एका ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. अब्कैक आणि खुरैस या परिसरात ही कंपनी विभागलेली आहे. यामुळे दोन्ही जागांवरचे तेल उत्पादन ठप्प झाले होते. या दोन्ही जागांवर बंद झालेले उत्पादन हे अरामकोच्या 50 % भाग होता. यानंतर कच्च्या तेलाची मागणी वाढू लागली आणि किंमतही वाढली.