एलपीजी, सीएनजीच्या दरातही वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

घरगुती गॅस सिलिंडरबरोबर आता सीएनजीही महाग झाला आहे. तसेच विमान इंधनाचे (एटीएफ) देशांतर्गत दर २६५० रूपये प्रति किलोलीटर वाढल्यामुळे हवाई प्रवासही आवाक्याबाहेर चालला आहे. या नवीन किमती रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दररोज होत असलेल्या वाढीमुळे अधीच त्रस्त असलेल्या सामान्यांवर आता महागाईचा वरवंटा अधिक वेगाने फिरणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्य किमती वाढल्याने काँग्रेचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e68fd6aa-c528-11e8-a98b-5b2df6bed3e6′]

सबसिडी असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत २.८९ रुपयांनी वाढून ती ५०२.४ रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. दिल्लीत विना सबसिडी असलेला सिलिंडर ५९ रुपयांनी महागला आहे. इंडियन ऑइलने जारी केलेल्या निवेदनानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमती आणि विदेश मुद्रा विनिमय दरातील चढ-उतारामुळे ही वाढ करण्यात आली आहे.

डीजी (DG) एस.पी. यादव सेवानिवृत्त

घरगुती गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकाच्या बँक खात्यात ऑक्टोबरमध्ये ३७६.६० रुपये प्रति सिलिंडर सबसिडी जमा केली जाईल. सप्टेंबर महिन्यात ३२०.४९ रुपये होत होती. दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरातही रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजी महाग झाला आहे. नोएडा आणि गाझियाबाद येथे १.९५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. विमान इंधनाच्या (एटीएफ) देशांतर्गत दरात २६५० रुपये प्रति किलालीटरची वाढ झाली आहे. ही वाढ १ ऑक्टोबरपासून लागू होईल. गेल्या महिन्यात एटीएफच्या दरात २२५० रुपये प्रति किलोलीटर वाढ झाली होती. या दरवाढीमुळे तिकीट दरात वाढ होऊन हवाई प्रवासदेखील महागणार आहे.

[amazon_link asins=’8193647912′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d347cb5-c529-11e8-91da-ab172d2d6ddb’]