धक्कादायक ! ठाण्यात पेपर ड्रग्जचा विळखा, काय आहे पाश्चिमात्य देशांत धुमाकूळ घालणारा हा पेपर बॉम्ब

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यात पोलिसांनी पेपर बॉम्बचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. पोलिसांनी १ ते दीड लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असून ड्रग्ज पेडलरला अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी एक किलो चरस जप्त केले आहे.

हितेश मल्होत्रा असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर दुसऱ्या कारवाईत क्राइम ब्रांचने पेपर बॉम्बेही जप्त केला आहे. त्यासोबत ४ किलो चरस, आणि एलएसडी पेपर असां १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काय आहे पेपर बॉम्ब ?

पेपर बॉम्ब म्हणजेच एलएसडी पेपर हा अनेक कोडवर्ड्सने ओळखला जातो. पिंक सुपरमॅन, ब्लू- बॅटमॅन, ब्लॅक स्पायडरमॅन, आय २५, असे विविध कोडवर्ड यासाठी वापरले जातात.

हे ड्रग्ज पावडर, टॅबलेट, लिक्विड, या तिन्ही प्रकारात उपलब्ध असते. या पेपरचा तुकडा जीभेवर ठेवल्यावर तो हळू हळू विरघळतो. त्यानंतर नशा होते. त्यामुळे सुपरहिरो असल्याचा भास होतो.

जगभरातील ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युरोपातील देशांमध्ये पेपर बॉम्बने धुमाकूळ घातला आहे. तेथे कडक निर्बंध असल्याने त्याने आता भारतात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

Loading...
You might also like