कॉंगोमध्ये तैनात असलेले भारतीय लष्कराचे लेफ्टनंट कर्नल गौरव सोलंकी ‘बेपत्ता’, शोधमोहीम सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथे भारतीय सैन्यदलासह संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेसाठी गेलेले भारतीय सैन्याचे लेफ्टनंट कर्नल गौरव सोलंकी शनिवारी दुपारपासूनच बेपत्ता आहेत. ते शनिवारी दुपारी किवू लेकमध्ये गेले होते, त्यानंतर त्यांना कोणीही पाहिले नाही.

पाच दिवसांपासून कर्नल सोलंकी हे बेपत्ता आहेत, त्यांना शोधण्यासाठी ‘सर्च ऑपरेशन’ (शोध मोहीम) सुरु करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांच्या गायब होण्याच्या कारणाबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

कर्नल सोलंकी यांच्या अचानकपणे गायब होण्याचा सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र शोधमोहीम सुरु आहे. किवू तलावापासून कर्नल सोलंकी अचानकपणे गायब झाले होते. आधुनिक नौका आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधकार्य वेगात सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –