“जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करत नाही, तोपर्यंत ऑपरेशन थांबवणार नाही”

श्रीनगर : वृत्तसंस्था- श्रीनगर येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय हवाई दलाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. हवाई दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लन आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. तसंच त्यांना महत्त्वाच्या मुद्दे मांडत त्यांनी माहिती दिली आहे.

भारताने २१ दिवसात १८ दहशतवादी ठार केले आहेत. त्यातील १४ जैशचे, २ हिज्बचे आणि २ लष्कर दहशतवादी ठार, केल्याची माहिती त्यांनी दिली. १८ पैकी पुलवामामध्ये ३ जैश-ए-महम्मदचे दहशतवादी ठार झाले आहेत. तसंच पुलवामा हल्ल्ल्याचा कट रचणारा ठार झाल्याचेही त्यांनी सांगितलं. जैशच्या कमांडरलाही सुरक्षा दलाने ठार केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जैश-ए-महंम्मदचा मुदस्सिर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. कामरान आणि मुदस्सर हे पुलवामा हल्ल्यातील मुख्य दहशतवादी भारतीय सुरक्षा दलाने ठार केले आहेत. जैश-ए-महंम्मदवर आमचे जास्त लक्ष राहील. आम्ही जितकी जोखीम घेतोय तितकी जास्त काळजीही आम्ही  घेत आहोत. आम्ही स्थानिकांना काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेत आहोत. पण आम्ही आमचे ऑपरेशन मागे घेणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. जोपर्यंत जम्मू काश्मीरमधील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करत नाही तोपर्यंत ऑपरेशन थांबवणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आम्ही यापुर्वीही घरच्यांना आव्हान केले होते. की त्यांनी त्यांच्या मुलांना घरी परत बोलवावे, आमचे पूर्वीसारखेच प्रयत्न राहतील, अशी माहिती पोलिस महानिरिक्षक, काश्मीर एस. पी. पानी यांनी दिली.

https://twitter.com/ANI/status/1105062972076908544