लेफ्टनंट शिवांगी बनणार नौदलाच्या पहिल्या महिला पायलट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवांगी भारतीय नौदलात सामील होणारी पहिली महिला पायलट होईल. दक्षिण कमानमध्ये शिवांगी यांचे प्रशिक्षण चालू आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिवांगी 2 डिसेंबर रोजी नौदलाची कमान सांभाळतील. शिवांगी 2 डिसेंबर रोजी पाळत ठेवणाऱ्या विमानाचे उड्डाण (फिक्स्ड विंग डॉर्नियर) करणार आहेत.

शिवांगी या मूळच्या बिहारच्या मुझफ्फरपूरच्या आहेत आणि तिने बारावीपर्यंत डीएव्ही पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर शिवांगीने सिक्कीम मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी.टेक केले. शिवांगीला भारतीय नौदल अकादमीमध्ये 27 एनओसी कोर्स अंतर्गत एसएसी (पायलट) म्हणून समाविष्ट केले गेले.

व्हाइस अ‍ॅडमिरल ए.के. चावला यांनी शिवांगीची गेल्या वर्षी जूनमध्ये औपचारिकपणे निवड केली. होती याच वर्षी भावना कांत यावर्षी भारतीय हवाई दलाची प्रथम महिला पायलट बनल्या होत्या.

Visit : Policenama.com