LTC Cash Voucher Scheme | 50 लाखापेक्षा जास्त केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फायद्याची गोष्ट, LTC Bill बाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : LTC Cash Voucher Scheme | कोरोनाव्हायरस मुळे 50 लाखापेक्षा जास्त केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी सूट मिळाली आहे. ज्यांना Government employee LTC Cash Voucher Scheme चा फायदा घ्यायचा आहे, त्यांच्याकडे अजूनही संधी आहे. ते 31 मार्च 2021 ला किंवा तत्पूर्वी LTC च्या नावावर केलेल्या खर्चाची सर्व बिले अजूनही जमा करू शकतात. त्यांची बिले क्लियर होतील. सरकारने Covid काळाचा विचार करून ही सवलत दिली आहे. याची अंतिम तारीख 31 मे, 2021 होती. अर्थ मंत्रालयाने आच आठवड्यात हा आदेश जारी केला आहे.

काय आहे LTC

कर्मचार्‍यांना एलटीसी दर 4 वर्षांनी मिळतो. या भत्त्यांतर्गत ते देशात कुठेही वर्षभरात एकवेळ प्रवास करू शकतात. कर्मचार्‍याला कुटुंबासोबत दोन वेळा आपल्या घरी जाण्याची संधी मिळते. या प्रवास भत्त्यात कर्मचार्‍याला विमान प्रवास आणि रेल्वे प्रवासाचा खर्च मिळतो. कोरोनामुळे जे लोक या एलटीसीचा लाभ घेऊ शकले नाहीत, त्या कर्मचार्‍यांना एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीमचा लाभ अजूनही दिला जात आहे.

LTC Cash Scheme चा फायदा

– LTC च्या बदल्यात कर्मचार्‍यांना Cash पैसे मिळतील.

– कर्मचारीच्या पदानुसार त्यास पेमेंट होईल.

– योजनेत कर्मचार्‍याला भाड्याच्या 3 पट खर्च करावा लागेल.

– GST रजिस्टर्ड व्हेंडर किंवा व्यापार्‍याकडूनच सेवा किंवा वस्तूंची खरेदी करावी लागेल.

– LTC क्लेम करताना GST रिसिट द्यावी लागेल.

हे देखील वाचा

Fire at CBI office । दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग; अधिकारी बाहेर पळाले, 5 अग्निशमन गाड्या दाखल

Sanjay Raut | नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी; राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : LTC Cash Voucher Scheme | 7th pay commission ltc special cash package scheme clarifications for settlement of bills pertaining to ltc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update