मोदी सरकारचा मोठा निर्णय ! प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणार्‍यांना सुद्धा मिळणार LTC कॅश व्हाऊचरचा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेस्टिव्ह सीझनमध्ये मोदी सरकारने गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले की, एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीमचा फायदा केंद्र सरकारी कर्मचार्‍यांशिवाय खासगी कंपन्या आणि सर्व राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सुद्धा मिळेल.

केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणे या कर्मचार्‍यांना सुद्धा मान्य एलटीसी फेयरच्या इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कमाल 36 हजार रुपये इन्कम टॅक्समध्ये सूट दिली जाईल.

एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम अतंर्गत किती मिळेल कर सवलत आणि किती लाभदायक आहे जाणून घेवूयात…

टॅक्स एक्सपर्ट गौरी चड्ढा यांच्यानुसार, जर तुम्ही एखादे कॉन्ट्रॅक्ट साइन केले किंवा एखादी ऑफर घेत असाल तर तुम्हाला टर्म अँड कंडीशन वाचणे खुप जरूरी आहे. सरकारने हे जे बेनिफिट जनतेला दिले आहे ही एक टॅक्स वाचवण्याची चांगली संधी आहे. परंतु तत्पूर्वी त्याची सविस्तर माहिती जाणून घेवूयात…

1. कर्मचारी 4 वर्षात दोनवेळा एलटीसीची सुविधा घेऊ शकतात.
2. याशिवाय सरकारी कर्मचार्‍यांना एलटीसीवर टॅक्स चुकवावा लागणार नाही.
3. प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचार्‍यांना सुद्धा 4 वर्षात 2 वेळा एलटीसीची सुविधा मिळते.
4. एलटीसीची सुविधा न घेतल्यास कंपनी टॅक्स कपातीनंतर शिल्लक देते.
5. नव्या स्कीम अंतर्गत लीव्ह इनकॅशमेंट आणि एलटीसीपेक्षा तीनपट जास्त खर्च केल्यानंतरच टॅक्स सूट मिळेल.
6. याशिवाय एलटीसीमधून मिळालेल्या पैशातून 3 पट किमतीचे सामान खरेदी करावे लागेल.
7. यशिवाय ज्यावर जीएसटी दर 12 टक्केपेक्षा जास्त आहे ते सामान खरेदी करावे लागेल.
8. जीएसटीचे बिल सुद्धा कर्मचार्‍यांना सादर करावे लागेल.
9. खरेदी 31 मार्च 2021 च्या पूर्वी करावी लागेल.