समाजवादी पार्टीचे अनेक राज्यसभा सदस्य भाजपाच्या संपर्कात, लवकरच पक्षांतर करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात खासदार आणि आमदार पक्ष बदलत आहेत. याचे लोन आता उत्तरप्रदेशात पोहोचले असून समाजवादी पक्षाचे तीन राज्यसभेतील खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे तीन खासदार भाजपच्या संपर्कात असून लवकरच ते प्रवेश करण्याची शक्यता आहे.

याआधी नीरज शेखर यांनी समाजवादी पक्ष सोडल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता इतर खासदार देखील भाजपमध्ये सामील होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अमरसिंग हे देखील समाजवादी पक्षाच्या तिकिटावर खासदार आहेत मात्र त्यांनी पक्षाचा साथ सोडला आहे. त्यानंतर अनेक वेळा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अनेक वेळा कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाची देखील चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर माध्यमांत आलेल्या माहितीनुसार बहुजन समाज पार्टीचे खासदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

अखिलेश यांच्याशी वादानंतर नीरज शेखर यांनी सोडला पक्ष

समाजवादी पक्षाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मुलगा नीरज शेखर यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत पारंपरिक मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या नीरज शेखर यांनी राजीनामा दिला होता.

You might also like