मुख्यमंत्री योगींना भेटले मुस्लिम धर्मगुरु, ‘मशिदी’साठी मागितली ‘अशी’ जागा ‘जिथं’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या बाबतच्या निकालानंतर सोमवारी शिया आणि सुन्नी मुस्लिम धर्मगुरुंनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. एक तास चाललेल्या या बैठकी दरम्यान मुस्लिम धर्मगुरुंनी यावेळी मुख्यमंत्रींकडे अशा जागेची मागणी केली ज्या ठिकाणी इस्लामिक युनिव्हर्सिटी बनवता येईल. तसेच यावेळी धर्मगुरुंनी मुख्यमंत्र्यांनी निकालानंतर शांतात कायम ठेवण्यासाठी महत्वाचे प्रयत्न केले म्हणून त्यांचे अभिनंदन देखील केले.

मोहसीन रजा यांच्या नेतृत्वाखाली घेतली भेट –

अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसीन रजा यांच्या नेतृत्वाखाली धर्मगुरुंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी धर्मगुरु मौलाना हमीदुल हसन, मौलाना सलमान हुसैन नदवी, मौलाना फरीदुल हसन, मौलाना यूसुफ हुसैनी यांच्या सोबत 15 धर्मगुरूंनी जवळ जवळ एक तास चर्चा केली. यावेळी धर्मगुरूंनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने त्यांचे आभार देखील मानले

अल्पसंख्यांकांबाबत पक्षपात झाला तर सांगा –

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धर्मगुरुंना अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या योजनाबाबतची माहिती दिली आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक प्रसार करण्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच अल्पसंख्यांकांसाठी सदैव मदत करण्यासाठी तयार असल्याचेही आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. अल्पसंख्यांकांना अनेकदा विनाकारण त्रास दिला जातो. असे जर एखादा अधिकारी किंवा इतर कोणी पक्षपाताची वागणूक देत असेल तर तत्काळ सूचना देण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

Visit : Policenama.com