स्मृती ईराणींनी ‘त्या’ निकटवर्तीयाच्या अंत्ययात्रेत पार्थिवाला दिला खांदा

अमेठी (उत्तरप्रदेश) : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सुरेंद्र सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सुरेंद्र सिंह हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते तसेच बरौलिया या गावचे माजी सरपंच होते. त्यांचे पार्थिव बरौलिया गावात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मृती इराणी यांनी सुरेंद्र यांच्या अंत्ययात्रेत पार्थिवाला खांदा दिला.

पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. निवडणुकीच्या वादातूनच हा खून झाल्याचे बोलले जात आहे. परिसरात सुरेंद्र यांचा चांगला प्रभाव होता याचा फायदा स्मृती इराणी यांना मिळाला. स्मृती इराणी यांच्या विजयानंतर सुरेंद्र यांचे महत्व वाढलं होतं. सुरेंद्र यांचे वाढलेले महत्व काहींना सहन झालं नसल्याचे बोलले जात आहे. सुरेंद्र सुरेंद्र स्मृती इराणी यांच्या जवळचे मानले जात होते.

सुरेंद्र यांचा मुलगा म्हणाला की, माझे वडील स्मृती इराणी यांच्या जवळचे होते आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळत होते. स्मृती इराणी यांच्या विजयानंतर विजयी मिरवणूक काढली जात होती. हि गोष्ट काँग्रेस नेत्यांना पसंद पडली नाही. बहुतेक यांमुळेच त्यांची हत्या करण्यात आली असावी.

पोलिसांनी सांगितले की, आम्ही काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. लवकरच या प्रकरणात सामील असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येईल.