UP च्या विधानसभा गेट नंबर 7 वर पोलीस निरीक्षकाने स्वतःवर झाडली गोळी, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये विधानसभा परिसरात पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येने खळबळ उडाली. विधानसभेच्या गेट नंबर 7 वर तैनात असलेले पोलीस निरीक्षक निर्मल चौबे यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.

तपासा दरम्यान आत्महत्या केलेल्या ठिकाणी पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे. ज्यात त्यांनी आजरपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हंटले आहे. चौबे यांनी मुख्यमंत्री यांना संबोधित एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मुलांची काळजी घेण्याविषयी म्हंटले. दरम्यान, पोलीस आता सुसाईड नोट संदर्भात तपास करत आहे.