दलित मतांचे विभाजन व्हावे म्हणूनच भाजपकडून भीम आर्मीची स्थापना

लखनऊ : वृत्तसंस्था – भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांनी वाराणासीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दलितांच्या मतांचं वीकरण व्हावे, यासाठीच भाजपानं षडयंत्र रचून भीम आर्मीची स्थापना केली आहे. असा आरोप करत मायावतींनी चंद्रशेखर यांना भाजपचे गुप्तहेर म्हंटले आहे. यापूर्वीही भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर भाजपचे हस्तक असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मायावतींनी भाजपा व चंद्रशेखर आझाद यांच्यावर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. मायावतींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘भाजपने दलित मतांचे विभाजन करून त्याचा फायदा मिळवण्यासाठी चंद्रशेखर यांना वाराणसीतून लोकसभेला उतरवले आहे. भाजपच्या दलित विरोधी धोरणांतून भीम आर्मीची निर्मिती झाली असून भाजपनेच या संघटनेला बळ दिले आहे. आता त्या आधारेच भाजप गलिच्छ राजकारण करत आहेत.

मतदारांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये मायावती म्हणाल्या की , ‘भाजपानं गुप्तचर म्हणून चंद्रशेखर यांना बीएसपीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचं षडयंत्र यशस्वी झालं नाही. अहंकारी, निरंकुश आणि जातीयवादी भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी आपलं एक एक मत बहुमूल्य आहे.’

मोदींच्याविरोधात तोडीस तोड उमेदवार उमेदवार मिळाला नाही म्हणून आपण स्वत: मोदींच्या विरोधात निवडणूक लढवू, असं म्हणत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.