मायावतींचा ‘दिलदार’पणा ! मुलायम सिंहांविरोधातील ‘खटला’ घेतला मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी आपला दिलदारपणा दाखवत समाजवादी पार्टीचे मुलायम सिंह यादव यांच्या विरोधात गेस्ट हाऊस कांड विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. फेब्रुवारी महिन्यातच या बाबतचे शपत पत्र मायावती यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. लोकसभा निवडणुकी वेळी एसपी आणि बीएसपी सोबत निवडणुकांच्या मैदानात उतरले होते यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता.

अखिलेश यांनी तक्रार मागे घेण्यासाठी केला होता आग्रह
लोकसभेसाठी दोनीही पक्षांनी युती केली होती त्यावेळी अखिलेश यादव यांनी मायावती यांच्याकडे तक्रार मागे घेण्यासंबंधी आग्रह धरला होता त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मायावती यांनी शपथपत्र दिले होते परंतु ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मायावती यांनी यांनी गेस्ट हाऊस बाबत माफ करण्याविषयी वक्तव्य केले होते.

काय होते गेस्ट हाऊस प्रकरण
1995 मध्ये मुलायम सिंह सरकारचे समर्थन काढून घेतल्यानंतर लखनऊ येथील गेस्ट हाऊस मध्ये समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मायावती यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यानंतर दोनीही पक्षांमध्ये हातापायी सुरु होती. मात्र गेल्या लोकसभेसाठी दोनीही पक्ष आपापसातील वाद विसरून एकत्र आले होते. मात्र निकालानंतर मायावतीने ही युती तोडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते.

Visit : Policenama.com