International Woman’s Day 2020 : लखनऊच्या IPS ज्योतिप्रिया सिंह गुन्हेगारांसाठी ठरल्या ‘कर्दनकाळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा शिक्षणाचा काळ होता, तेव्हा लखनऊ विद्यापीठातून चान्सलर गोल्ड मेडल मिळवले. मैदानात उतरल्यावर नॅशनल टीमपर्यंत प्रवास केला. यानंतर जेव्हा आयपीएसची झाल्या तेव्हा गुन्हेगारांसाठी दहशत ठरल्या. नेता असो व माफिया कोणीही टिकू शकले नाही. ह्या कोणत्या रील-लाइफच्या नायिका नाहीत तर रिअल लाईफच्या आयपीएस अधिकारी ज्योती प्रिया सिंह आहेत. ज्योती प्रिया सिंह, २००८ बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी असून लखनऊ येथील रहिवासी आहेत. त्या सध्या देशातील महत्त्वाच्या तपास यंत्रणा एनआयएकडे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

ज्योतिप्रिया देशातील त्या अधिकाऱ्यांसाठी एक उदाहरण आहे, जे सत्ता आणि पैशाच्या चकाकीत कर्तव्यपासून मागे हटतात. महाराष्ट्रात तैनात असताना एक घटनेनंतर ज्योती प्रिया देशभर चर्चेत आल्या. कोल्हापुरात अतिरिक्त एसपी पदावर असताना ज्योती प्रिया यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार आणि त्यांच्या डझनभर समर्थकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या सर्वांनी गणेश विसर्जनावेळी काही पोलिस कर्मचाऱ्यांशी अभद्र व्यवहार केला. महिला पोलिसांच्या तक्रारीवरून ज्योती प्रिया यांनी आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर, विभागापासून ते सरकारपर्यंत सगळीकडून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, परंतु ज्योती यांनी खटला मागे घेतला नाही. त्यानंतर त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरल्या. सहा फुटापेक्षा जास्त उंच असणाऱ्या ज्योती प्रिया सिंह यांनी या घटनेनंतर टपोरीगिरी करणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी खास ऑपरेशन सुरु केले.

अभ्यासाबरोबरच ज्योती मैदानावरही चॅम्पियन ठरल्या. त्यांनी स्कूल-कॉलेज आणि विद्यापीठानंतर बास्केटबॉलमध्ये ज्युनियर इंडिया टीम पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. खेळाच्या मैदानावर त्यांना आपल्या आतील खेळाडू वृत्ती दाखविण्याची संधी मिळाली. त्यांचे वडील भारतीय व्हॉलीबॉल संघाचे माजी कर्णधार अर्जुन पुरस्कार विजेते आणि सेवानिवृत्त पीपीएस अधिकारी रणवीर सिंग आणि आई अ‍ॅना सिंह उत्तर प्रदेश आणि भारतीय महिला संघाची माजी खेळाडू आहेत. आई लखनऊ येथील महिला महाविद्यालयातही प्रवक्त्या होत्या. ज्योती यांनी लीवीवि येथून शिक्षण घेतले. इथल्या जीवशास्त्रात अव्वल क्रमांकासाठी २००३ मध्ये त्यांना चान्सलर गोल्ड मेडल मिळाले. ज्योती सांगतात कि, त्यांना लहानपणापासूनच आयएएस अधिकारी व्हायचे होते. यूपीएससी परीक्षेत त्यांना १७१ रँक मिळाला आणि आयपीएस कॅडर घ्यावा लागला.