कोरोना पॉझिटिव्ह निघाला दिड कोटीचे सोने आणणारा तस्कर, लखनऊ एयरपोर्टवर पकडले होते कस्टम टीमने

लखनऊ : दुबईहून एक तस्कर सुमारे दिड कोटी रुपयांच्या सोन्यासह चौधरी चरण सिंह अंतरराष्ट्रीय एयरपोर्टवर पोहचला. येथे जेव्हा त्याची अँटीजन कोरोना चाचणी झाली तेव्हा एकच खळबळ उडाली. हा तस्कर कोरोना पॉझिटिव्ह निघाला. शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस दुबईहून आलेल्या एकुण पाच तस्करांना कस्टमच्या टीमने पकडले. ज्यांच्याकडून 3422 ग्रॅम सोने जपत झाले. जप्त सोन्याची किंमत 1.61 कोटी रुपये आहे. यामध्ये आजमगढचा राहणारा राकेश यादव शनिवारी इंडिगो एयरलाइनचे विमान 6ई-8457 ने दुबईहून लखनऊ एयरपोर्टवर आला होता. येथे तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याची तपासणी कस्टम विभागाच्या टीमने केली. राकेश यादवने सुमारे दिड किलो सोन्याची पेस्ट अंडरवियरमध्ये लपवली होती.

कस्टम उपायुक्त निहारिका लाखाने सांगितले की, चौकशीत त्याने सांगितले की, तो सीमा शुल्क न भरताच सोने घेऊन येत होता. त्याची चौकशी केल्यानंतर मुख्य दंडाधिकारी आर्थिक गुन्हे लखनऊ यांच्या समोर हजर करण्यात आले. तर आरोग्य विभागाच्या टीमने दोन दिवसात सर्व पाच तस्करांची कोरोना अँटीजन टेस्ट केली. यामध्ये आजमगढ येथे राहणारा तस्कर राकेश यादव कोरोना पॉझिटिव्ह आढळला. आरोग्य विभागाने घटनास्थळीच राकेश कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती कस्टम विभागाला दिली.

आता होईल काँटॅक्ट ट्रेसिंग : कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या तस्करासह प्रवास करणार्‍या प्रवाशांचा सुद्धा शोध घेतला जाईल. एसीएमओ डॉ. एम. के. सिंह यांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. तसेच विमान सॅनिटाइज करण्याचे आदेश सुद्धा कंपनीला देण्यात आले आहेत.

रिपोर्टनंतर उघड झाले प्रकरण : कस्टम विभागाच्या टीमने हे संपूर्ण प्रकरण हाताळले. तस्कराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाच्या टीमने जेव्हा प्रकरण उघड केले तेव्हा कस्टम विभागामध्ये खळबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत सोने तस्करी कारवाई सुरू होती.