पोलिस अधिकार्‍यानं दाढी ठेवणं आणि सॅल्यूटच्या जागी ‘आदाब’ संदर्भात मुख्यमंत्री योगींच्या माहिती सल्लागारांनी केलं ‘हे’ ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   उत्तर प्रदेशच्या बागपत येथील रमाला पोलिस स्टेशनमध्ये तैनात उपनिरीक्षक इंतसार अली यांना परवानगी न घेता लांब दाढी ठेवण्याच्या आरोपाखाली पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले होते. त्यानंतर दारोगा इंतसार अली यांनी दाढी कट करण्याचे विनंती पत्र दिल्यानंतर पोलिस अधीक्षक अभिषेक सिंह यांनी त्यांना पुन्हा कामावर घेतले.

या प्रकरणात आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या माहिती सल्लागार यांनी शलभ मणि त्रिपाठी यांनी ट्विट केले आहे. शलभ मणि त्रिपाठी यांनी लिहिले की, “इंतसार अली दारोगा आहे, ते नियमाविरुद्ध दाढी ठेवत होते, सेल्यूटच्या जागी आदाब करत होते, सरकार बदलण्याचा फरक ते समजू शकले नाही, त्यांच्या हे लक्षात नव्हते की, युपीमध्ये आता कायद्याचे राज्य आहे, म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांना कामावर परत तेव्हा घेण्यात आले जेव्हा ते सन्मानाने पोशाखात परत आले. आता देश बाबासाहेबांच्या संविधानाने चालत राहिल. ”

पोलिस अधीक्षकांनी दारोगा इंतसार अलीला तिनवेळा दाढी करण्याचा इशारा दिला होता. त्याला दाढी करण्यासाठी विभागाकडून परवानगी घेण्यास सांगण्यात आले होते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून, दारोगा इस्तार अली या आदेशाकडे दुर्लक्ष करीत दाढी ठेवत होते. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते.

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, उपनिरीक्षक इंतसार अली यांनी एक अर्ज दिला होता, त्यामध्ये ते म्हणाले की, पोलिसांच्या नियमाप्रमाणे दाढी कापली गेली आहे. त्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले. सहारनपूरचा रहिवासी इंतसार अली यांची युपी पोलिसात एसआय म्हणून भरती झाली आणि गेली तीन वर्षे बागपत जिल्ह्यात कार्यरत आहे. लॉकडाउन होण्यापूर्वी ते रामला पोलिस ठाण्यात तैनात होते.

डीजीपीने जारी केल्या सूचना

दुसरीकडे, या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशचे पोलिस प्रमुख डीजीपी एचसी अवस्थी यांनी पोलिसांच्या गणवेश, शूज, केस आणि दाढी या संदर्भात सूचना जारी केल्या आहेत. सूचनांनुसार, शीख धर्माच्या पोलिसांकर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही दाढी ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. एवढेच नव्हे तर शीख धर्म सोडून इतर सर्व पोलिसांना दाढी क्लिन शेव्ह ठेवली पाहिजे. असेही म्हटले आहे की, धार्मिक कारणास्तव केस किंवा दाढी तात्पुरती ठेवण्यासाठी पोलिसांना त्यांच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. योगी सरकारचा हा एक मोठा निर्णय मानला जातो.

बटणापासून ते बूटांच्या रंगापर्यंत …

नवरात्रात, सावन, मुलाचा जन्म, कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूनंतर, हिंदू धर्मात केस किंवा दाढी कट करण्यास मनाई असते. अशा परिस्थितीत पोलिस विभागाच्या प्रमुखांकडून परवानगी घेतल्यावर पोलिस आपले केस आणि दाढी ठेवू शकतात. यासह, वर्दी घालताना शर्टच्या बटणापासून शूजच्या रंगापर्यंतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. स्पोट्स शूज, चप्पल किंवा सॅंडल घालण्यावर कडक बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, डीजीपी एचसी अवस्थी यांनी अधिकाऱ्ना सूचना दिल्या आहेत की, चुकीचा युनिफॉर्म घातलेल्यांना टोकले पाहिजे.