Coronavirus : UP मध्ये 37 जिल्ह्यांत ‘कोरोना’चे थैमान, 317 पॉझिटिव्ह रुग्ण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. सोमवारी 39 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडेवारी 317 वर पोहोचली. त्यापैकी 35 रुग्ण हे दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकझ तबलीघी जमातमध्ये सामील होऊन परत आले होते. तबलीझी जमातमध्ये आलेले 179 लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.

37 जिल्ह्यांमध्ये पसरला विषाणू :
सोमवारी 547 संशयित रुग्णांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत उत्तर प्रदेशातील 37 जिल्ह्यांत या विषाणूने आपले पाय पसरले आहे. संसर्गजन्य रोग विभागाचे सहसंचालक डॉ विकास इंदू अग्रवाल यांनी सांगितले की, सोमवारी कौशांबी येथे एक नवीन आणि आग्रा येथे पाच नवीन रुग्ण आढळले, त्यातील तीन तबलीगी जमातचे होते. हे पाचही लोक लखनऊमधील तबलीगी जमात आहेत. सहारनपुरातील चार, बुलंदशहरमधील दोन, मथुरामधील दोनपैकी एकाचा तबलीगी जमातमध्ये समावेश होता. सीतापूरमधील सर्व आठही जण तबलिगी जामतचे आहे तर कानपुर नगर बिजनौर आणि बदायूंमधील तबलीगी जमातीच्या प्रत्येकी एकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले.

दरम्यान, सोमवारी नोएडामध्ये एकही संक्रमित रुग्ण आढळला नाही. नोएडामध्ये आतापर्यंत 58, बरेलीमध्ये सहा, बुलंदशहरमध्ये तीन, बस्तीमध्ये पाच, पीलीभीतमधील दोन, कौशांबीमध्ये एक आणि मुरादाबादमधील दोन रुग्ण आढळले आहेत आणि या रुग्णांत एकही तबलीगी जमातचा रुग्ण नाही. तर आग्रा येथे आढळलेल्या 52 रुग्णांपैकी 32 रुग्ण तबलीघी जमातचे आहेत. लखनऊमधील 22 पैकी 12, गाझियाबादमधील 23 पैकी 14, लखीमपुर खेरीतील चार पैकी तीन, सीतापूरमध्ये आठ, मथुरामध्ये दोनपैकी एक, कानपूर नगरातील आठ पैकी सात, वाराणसीत सात पैकी चार, शामलीत 17 पैकी 16, जौनपूरमधील तीन पैकी दोन, बागपतमध्ये दोनपैकी एक, मेरठमध्ये 33 पैकी 13, गाझिपूरमध्ये सर्व पाच जण, हापूरमध्ये तिघेही, सहारनपुरातील सर्व 17, बांदामधील दोघेही आणि महाराजगंजमधील सर्व सहा, संक्रमित तबलीगी जमातचे असल्याचे समजते.