लखनऊ कोर्टातील बॉम्बस्फोट प्रकरणात ‘बार असोसिएशन’च्या सरचिटणीसास अटक

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील वजीरगंज येथील कोर्टात एका देशी बॉम्बचा स्फोट झाला होता. या घटनेत अनेक वकील जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बार असोसिएशनच्या सरचिटणीसासह काही जाणांना अटक केली आहे. जितू यादव असे अटक करण्यात आलेल्या बार असोसिएशनच्या सरचिटणीसचे नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून ही कारवाई केली आहे.
लखनऊ पोलीस आयुक्तांनी सांगितले की, कोर्टात दहशत पसरवण्यासाठी बॉम्ब हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अ‍ॅड. संजीव लोधी यांनी तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कोर्ट परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही तपासून ही कारवाई केली.

काय आहे प्रकरण ?
अ‍ॅड. संजीव लोधी यांच्या दिशेने बॉम्ब फेकण्यात आला होता. मात्र, सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले. दोन गटांमधील संघर्षाचा हा परिणाम असल्याचे त्यावेळी पोलिसांनी म्हटले होते. अचानक स्फोटाचा आवाज झाल्यानंतर कोर्टात सगळीकडे खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेचा तपास करून बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यासह काही जणांना अटक केली.

You might also like