राज्यपालांनीच केले आचारसंहितेचे उल्लंघन ? आयोग राष्ट्रपतींना लिहणार पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. नेत्यांकडून किंवा पक्षाकडून तसेच अन्य कोणाकडून आचारसंहितेचे उल्लंघन केले जात नाही ना याकडे निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. अशातच राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरुन आयोगाने नाराजी व्यक्त केली असून आज निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच या संदर्भात आयोग राष्ट्रपतींना पत्र लिहण्याचा विचार करत आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. नेत्यांकडून किंवा पक्षाकडून तसेच अन्य कोणाकडून आचारसंहितेचे उल्लंघन केले जात नाही ना याकडे निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. अशातच राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरुन आयोगाने नाराजी व्यक्त केली असून त्यावर आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. इतक नव्हे तर आयोग यासंदर्भात राष्ट्रपतींना पत्र देखील लिहण्याचा विचार करत आहे.

अलिगडमध्ये २५ मार्च रोजी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मोदींना समर्थन दिले. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे देखील कल्याण सिंह यांनी म्हटले आहे. देशातील सर्व नागरिक हे भाजपचे कार्यकर्ते आहे. माझी इच्छा आहे की भाजपने निवडणूक जिंकावी. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हे देशासाठी गरजेचे असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

कल्याण सिंह यांच्या या विधानावर आज आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांच्या विधानावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच आयोग राष्ट्रपतींना किंवा कल्याण सिंह यांना पत्र देखील लिहू शकते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले कल्याण सिंह यांनी बाबरी मशिद पाडल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. ते १९९१ मध्ये मुख्यमंत्री झाले होते. यानंतर सप्टेंबर २०१७ ते १२ नोव्हेंबर १९९९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like