Coronavirus : उत्तर प्रदेशात 25 वर्षाच्या युवकाचा ‘कोरोना’मुळं मृत्यू, कमी वयाचा देशातील पहिला ‘रूग्ण’

लखनऊः वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये कोरोना विषाणूने मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे. बस्तीच्या तुकहिया मोहल्ला येथे राहणाऱ्या 25 वर्षीय तरूणाचा सोमवारी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये केलेल्या तपासणीत कोरोनाची पुष्टी झाली होती. मात्र, पुढील चाचणीसाठी त्याला लखनऊमधील केजीएमयू लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. तिथे तरुणामध्ये कोरोनाची पुष्टी झाली.

इतक्या लहान वयात या देशात मृत्यूची ही पहिली घटना आहे. केजीएमयू लखनऊचे मीडिया प्रभारी डॉ. सुधीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, गोरखपूरहून जो नमुना आला होता तो सकारात्मक आला आहे. गोरखपूरमधील झालेला तपासही योग्य होता. केजीएमयूकडून क्रॉस चेक केले जाणार होते. त्यातही हे प्रकरण योग्य असल्याचे दिसून आले.

मृत व्यक्ती बस्ती जिल्ह्यातील तुकहिया परिसरातील रहिवासी होता. तो 25 वर्षांचा होता आणि तो किराणामालाचे दुकान चालवत होता. डॉक्टरांच्या मते, गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्याने कोणताही प्रवास केल्याचे आढळून आले नाही, परंतु सामान्यत: तो आजारी पडला होता.

या युवकावर गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. बीआरडी मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेने त्याला कोरोना झाल्याचे आधीच कन्फर्म केले होते. या युवकाचा सोमवारीच मृत्यू झाला, परंतु बीआरडी मेडिकल कॉलेजने पुन्हा नमुना तपासणीसाठी केजीएमयूला पाठविला होता. केजीएमयूमध्ये पुन्हा तपासणीनंतर तरुणांमध्ये कोरोनाची पुन्हा पुष्टी झाली.

कुटुंब आणि डॉक्टरांना केले क्वारंटाइन
रविवारी या युवकाला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्याला कोरोना वॉर्डात ठेवण्यात आले नव्हते. नंतर लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला कोरोना वॉर्डमध्ये हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार करणार्‍या 12 डॉक्टरांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेण्यात येत आहे.