UP : मुख्यमंत्री निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि इतर अनेक महत्त्वाची ठिकाणं बॉम्ब स्फोटानं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. कॉल सेंटरवर ही धमकी देण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेत मुख्यमंत्री निवासस्थान, 5 कालिदास मार्गाची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. बॉम्बविरोधी पथक आणि श्वानपथकाची मदतीने परिसरात तपास सुरु केला आहे.

नुकतेच, मुख्यमंत्री योगी यांना धमकी दिल्या प्रकरणी मुंबईतील एका तरूणाला अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी धमकावणाऱ्या कामरानला महाराष्ट्र एटीएस आणि यूपी एटीएसने संयुक्त कारवाई करून अटक केली कामरानच्या अटकेनंतर यूपी पोलिसांच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कला नवी धमकी मिळाली असून मुंबईहून अटक केलेल्या तरुणाला सोडून द्या, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहा, अशी धमकी देण्यात आली. या तरूणाला नंतर महाराष्ट्र एटीएसने केली. या 20 वर्षीय युवकास नाशिक येथून अटक करण्यात आली.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 22 मे रोजी लखनऊ पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर कामरान याने फोन केला होता. आणि बॉम्बस्फोट घडवून योगी आदित्यानाथ यांची हत्या करणार असल्याचे सांगितले होते. याबाबत गोतमी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.