इंटरनेटवर अश्लिल कंटेट शोधताय ? तर सावधान, आता होणार कारवाई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवंनव्या टेक्नॉलोजीमुळे भारतात इंटरनेटचा वापर वाढला आहे. इंटरनेटचा वापर करताना बहुतांश जण पॉर्न व्हिडिओ पाहणे किंवा कोणताही अश्लिल कंटेट पाहतात. पण आता तुम्ही असं काही केलं तर तुमच्यावर थेट कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता असे काही अश्लिल कंटेट पाहणे टाळावे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी 1090 ची सेवा सुरु केली आहे. त्यानुसार, अश्लिल कंटेट पाहणाऱ्या लोकांवर 1090 ची टीम नजर ठेवणार आहे. अशाप्रकारचा कंटेट पाहणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून नजर ठेवली जाणार आहे. तसेच ही सर्व माहिती पोलिसांकडे असणार आहे. त्यामुळे भविष्यात जर कोणताही छेडछाड किंवा अत्याचार यांसारखे गुन्हे घडले तर हा डाटा कामी येईल आणि गुन्हेगाराला बेड्या घातल्या जातील.

याबाबत ADG नीरा रावत यांनी सांगितले, की इंटरनेटचा वाढता वापर पाहता 1090 नेही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याच माध्यमाचा वापर केला. या ऍनालिटिक्सचा अभ्यास करण्यासाठी oomuph कंपनी असेल. या डाटाच्या माध्यमातून तुम्ही काय सर्च करता यावर नजर ठेवली जाणार आहे.

तसेच जर कोणीतीही व्यक्ती इंटरनेटवर अश्लिल कंटेट पाहील तर त्याचे संकेत ऍनालिटिक्स टीमला मिळेल. त्यानंतर टीमकडून 1090 टीमला सांगितले जाईल. 1090 ची टीम संबंधित व्यक्तीला एक मेसेज करून सतर्क करणारा मेसेज देईल आणि अशा पद्धतीने कोणत्याही गुन्ह्याची सुरुवात होण्यापूर्वीच गुन्हा रोखता येऊ शकेल. तसेच जर महिलांची छेड काढली तरही 1090 टीम कारवाई करेल.