कमलेश तिवारी मर्डरकेस : आरोपींचा ‘कबूल’नामा, सांगितलं ‘हत्ये’चं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी चार दिवसांनंतर गुजरात एटीएसने दोन मुख्य आरोपींना अटक केल्यानंतर आता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. राजस्थानमधून दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मुख्य आरोपी शेख अशफाक हुसैन आणि पठान मोइनुद्दीन अहमद या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. कमलेश तिवारी यांनी दिलेल्या विवादित वक्तव्यामुळे त्यांची हत्या केल्याची माहिती दोन्ही आरोपींनी दिली. या वक्त्यामुळे कमलेश तिवारी यांना अटक देखील झाली होती. मात्र सध्या ते जामिनावर बाहेर होते.

अशफाकने चिरला कमलेश यांचा गळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्फाक याने कमलेश यांच्या गळ्यावर चाकूने वार करत त्यांची हत्या केली. तो एका मोठ्या कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेजेन्टेटिव होता. हत्येच्यावेळी त्याच्या देखील हाताला जखम झाली होती. तर दुसरा आरोपी मोईनुद्दीन फूड डिलेवरीचे काम करत असे. त्याने कमलेश यांना गोळी मारली. या हत्येमागील सूत्रधार राशिद पठान, मौलाना मोहसिन आणि फैजान या तिघांनी या दोघांचे ब्रेनवॉश करत त्यांना हत्येसाठी तयार केले होते. मागील दीड वर्षांपासून हे सर्व संपर्कात होते.

आतापर्यंत 6 जणांना अटक
गुजरात एटीएसचे डीआयजी हिमांशु शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सूत्रधारांना अटक करण्यात आली असून अन्य एका आरोपीला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. तसेच खून करणाऱ्या दोघांना राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले होते.

Visit : Policenama.com

You might also like