कमलेश तिवारी मर्डरकेस : चाकूनं 15 सपासप वार करून गोळी झाडली, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश पोलिसांनी कमलेश तिवारी हत्याकांडमध्ये वापरण्यात आलेला चाकू जप्त केला आहे. बुधवारी पोस्टमार्टम रिपोर्ट देखील समोर आले. कमलेश तिवारी यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्यावर 15 वेळा चाकूने वार करण्यात आले. तसेच एक-एक गोळी देखील झाडण्यात आली. गळा दाबल्याचे निशाणं देखील आहे. 15 चाकूचे वार 10 सेंटीमीटरपर्यंत जबड्याच्या खाली छातीपर्यंत करण्यात आले आहेत.

कमलेश तिवारीचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा –
कमलेश तिवारी यांच्यावर वार करण्यात आल्यानंतर गळा देखील आवळण्यात आला. तसेच पाठीवर देखील चाकूने वार करण्यात आले. चेहऱ्यावर एक गोळी देखील मारण्यात आली. डोक्याच्या मागच्या भागात गोळी अडकली होती.

शनिवारी लखनऊ पोलिसांना कैसरबागच्या हॉटेल खालसा मध्ये दोन आरोपींचे कपडे मिळाले. त्याच दिवशी सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी हत्यामध्ये वापरण्यात आलेला चाकू जप्त केला आहे. रविवारी गुजरात एटीएसने खुलासा केली की हत्येतील आरोपी अशफाक फेसबूकवर रोहित सोलंकी या खोट्या नावाने कमलेश तिवारी यांच्याशी चॅट करत होता. रोहित सोलंकीच्या खोट्या आयडीच्या आधारे आशफाक कमलेश तिवारीशी जोडला गेला होता आणि पक्षात सहभागी होण्याचा बाहण्याने तो तिवारी यांना भेटण्यासाठी आला होता.

हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या शुक्रवारी लखनऊ मध्ये झाली. लखनऊ पोलिसांना रविवारी एका हॉटेलमध्ये आरोपीचें रक्ताने माखलेले कपडे मिळाले, या हत्यानंतर आरोपी फरार झाले.

Visit : Policenama.com