कमलेश तिवारी मर्डरकेस : दुबईमध्ये रचला ‘कट’ अन् सूरतमध्ये खरेदी केली ‘बंदुक’, लखनौमध्ये गळा चिरून ‘हत्या’

लखनऊ : वृत्तसंस्था – हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी मोठा उलगडा झाला आहे. कमलेश तिवारी यांची हत्या जरी लखनऊमध्ये गळा कापून झाली असली तरी त्यांच्या हत्येचा कट दुबईत रचण्यात आला होता. गुजरात एटीएसने दावा केला आहे की, कमलेश तिवारी यांच्या हत्येसाठी सूरतमधून बंदूक खरेदी करण्यात आली होती. तर कट रचल्यानंतर एक व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी दुबईतून भारतात कमलेश यांच्या हत्येसाठी भारतात आला होता.

हल्लेखोरांना प्रशिक्षण –

कमलेश तिवारी यांच्या हत्येसाठी दुबईतून आलेल्या दोन लोकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. सूरतमधून मिठाई खरदी करणारे दोघे शुटर होते. शुक्रवारी कमलेश तिवारी यांची लखनऊमध्ये गळा कापून हत्या करण्यात आली होती. 24 तासात गुजरात एटीएसने या गुन्ह्याचा छडा लावला.

मिठाईच्या डब्यातून आणली शस्त्र –

कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरामध्ये सूरत घरी मिठाईचा डबा सापडला होता. सूरतची प्रसिद्ध मिठाई असलेल्या डब्यातून आरोपींनी शस्त्र आणली होती. हल्लेखोरांनी सूरतमध्ये जिथून मिठाई खरेदी केली त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले होते. शनिवारी सकाळी या प्रकरणी सुरतमध्ये पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एक या गुन्ह्यात असल्याचा संशय होता.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी