BJP नेत्याला पत्नीनं ‘तिच्या’सोबत ‘रंगेहाथ’ पकडलं, नंतर दोघी ‘भिडल्या’ एकमेकींशी, प्रकरण पोलिस ठाण्यात गेलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्रीकांत त्यागी यांच्या पत्नी अनु त्यागी आणि श्रीकांत यांची मैत्रीण मांडवी सिंह यांच्या जोरदार हाणामारी झाली. या घटनेची एफआयआर गोमतीनगर ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नोएडाचे राहणारे भाजपचे शेतकरी नेते श्रीकांत त्यागी यांनी गोमती नगरच्या ग्रीनवूड अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे, या अपार्टमेंटमध्ये मांडवी सिंह राहत होती. रविवारी रात्री श्रीकांत आपल्या फ्लॅटवर पोहोचले होते, त्याच दरम्यान त्यांची पत्नी अनु आपल्या दोन मुलांसह तेथे पोहोचली.

अनु जेव्हा फ्लॅटमध्ये जात होत्या तेव्हाच नेमकी मांडवी सिंह त्या फ्लॅटमधून बाहेर येत होत्या. दोघी एकमेकींसमोर आल्या आणि एकमेकींना मारहाण करु लागल्या. या हाणामारीत दोघांचे मोबाइल फोन फुटले. ही घटना रात्री उशीरा घडली. वाद वाढल्याने तेथे गोमती नगर महासमितीचे पदाधिकारी देखील आले आणि कोणीतरी फोन करुन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर प्रकरणं पोलीस ठाण्यात गेले. पोलीस स्टेशनमध्ये अनूने आपल्या पती श्रीकांतची खरडपट्टी काढली.

दोन्हीकडून दाखल करण्यात आली एफआयआर –
अनु यांच्या एफआयआरनुसार, त्यांचे पती आणि मांडवी सिंह यांच्या अनैतिक संबंध होते, त्या म्हणाल्या की पतीसोबत मांडवी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या इमारतीत पोहोचल्या होत्या, जेथे मांडवीने त्यांच्यासोबत मारहाण केली. तर मांडवी यांच्या एफआयआरनुसार, रात्री 12 वाजता त्या इमारतीत फिरत होत्या तेव्हा त्यांच्या ओळखीच्या असलेल्या श्रीकांत त्यागी त्यांच्या पत्नीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि मोबाइल फोडला.

गोमती नगरचे पोलीस निरीक्षक अमित दुबे यांच्या मते, दोन्ही बाजूंनी एफआयआर दाखल करण्यात आली आहे आणि तपास सुरु आहे.

You might also like