सरकारचा ‘दणका’ ! निवृत्त IG, काँग्रेस नेत्यासह 130 आंदोलकांकडून 50 लाख ‘वसूल’ करणार

लखनऊ : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे १९ डिसेंबर रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या  आंदोलनानंतर प्रशासनाने हिंसक संघर्ष आणि जाळपोळीच्या प्रकरणातील वसुलीसाठी कार्यवाही सुरू केली आहे. हिंसाचारातील १३० आरोपींकडून मालमत्ता वसूल करण्याची नोटीस जारी केली आहे. सेवानिवृत्त आयजी एस.आर. दारापुरी, काॅंग्रेस नेते सदाफ जफर आणि रिहाई मंचचे मोहम्मद शोएब यांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने १०० हून अधिक लोकांना नुकसान भरपाईची नोटीस दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

हजरतगंज पोलिसांनी तयार केलेल्या १३० बंडखोरांच्या यादीवर जिल्हा प्रशासनाने ही नोटीस बजावली आहे. रामपूर २८, संभल २६, बिजनोर ४३ आणि गोरखपूरमध्ये ३३ जणांना नोटीस देण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यात झालेल्या हिंसक निदर्शनांच्या वेळी ३ कोटींहून अधिक रकमेच्या संपत्तीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यानुसार रामपूरमध्ये १४.८६ लाख रुपये, संभलमध्ये १५ लाख आणि बिजनोरमध्ये १९.७ लाख रुपयांच्या मालमत्तेचं आंदोलनात नुकसान झालं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचारामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या यादीवर चिन्हांकित केल्यानंतर त्यांना नोटीस पाठविली असून आठवड्याभरात उत्तर देण्यास सांगितले आहे. यानंतर, जर ते स्वत: ला निर्दोष सिद्ध करु शकत नाहीत तर त्यांना सरकारला भरपाई म्हणून निश्चित रक्कम द्यावी लागेल. विहित रक्कम न भरणाऱ्यांवर तुरूंगात जाण्यासह कायदेशीर कारवाई केली जाईल.

SC च्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले जात आहे
लखनऊचे जिल्हा दंडाधिकारी (डीएम) अभिषेक प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात जवळपास कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे. प्रत्येक क्षेत्रात होणाऱ्या नुकसानीचे आकलन केल्यानंतर हिंसाचार करणार्‍यांवर दंडाची रक्कम निश्चित केली जाईल. ते म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून ही कारवाई सुरू केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/