विद्यार्थ्याचा थेट CM ला धमकीचा मेसेज, शाळा सुरू करा नाही तर…

आग्रा : पोलीसनामा ऑनलाइन –   शाळा आणि महाविद्यालये अद्यापही सुरू न झाल्याने आमचे नुकसान होत आहे, अशी तक्रार करत एका अल्पवयीन विद्यार्थ्याने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांना धमकीचा मेसेज पाठवला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. मोबाईल आणि सीम कार्ड जप्त करून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 क्रमांकावर हा मेसेज आल्यापासून पोलीस सतर्क झाले आहेत. लखनऊ पोलिसांनी मेसेज आलेल्या मोबाईल क्रमांकाचा तपास केला असता, तो मेसेज आग्रा येथून आल्याचे समोर आल्याची माहिती पोलीस उपायुक्त रईस अख्तर यांनी दिली आहे.

या प्रकरणी लखऩऊ पोलीस थेट आग्र्यात पोहाेचले आहेत. पण धमकीचा मेसेज करणाऱ्या विद्यार्थ्याला पकडल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने सहज मेसेज केल्याचे सांगितले. शाळा बंद असल्यानं आमचे नुकसान होत आहे. त्यामुळे मी मेसेज केला होता, असे तो पोलिसांना म्हणाला.