गुन्ह्यात जप्त केलेल्या गाडीतून ‘पिकनीक’ला निघाले पोलिस कर्मचारी, कार मारलकांन GPS व्दारे केलं ‘लॉक’

लखनऊ : वृत्तसंस्था – तसे पाहायला गेले तर युपी पोलीस आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी मात्र पोलिसांच्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लखनऊ मधील गोमती नगर पोलिसांनी मारामारी केल्या प्रकरणी एका तरुणाची गाडी जप्त केली होती. या गाडीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. आणि गाडीच्या मालकाला सकाळी येऊन गाडी घेऊन जायला सांगितले होते. पोलिसांचा एक ग्रुप गाडी घेऊन पिकनिक साठी गेला होता. जेव्हा गाडीच्या मालकाला ही गोष्ट समजली तेव्हा मात्र त्याने त्याची गाडी लॉक केली. जप्त केलेल्या वाहनात जीपीएस सिस्टम होते ज्याद्वारे गाडीचे लोकेशन मालकाला दिसत होते.

गाडी लॉक केल्यानंतर पोलिसांनी मालकाला गाडी उघडण्याची विनंती करण्यास सुरवात केली. ही बाब जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ही बाब लखनऊच्या पोलिस आयुक्तांकडे पोहोचली तेव्हा त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि गोमतीनगर प्रभारी निरीक्षकांकडे लाईन हलविली.

असे सांगितले जात आहे की, पोलीस जप्त केलेल्या गाडीला घेऊन लखीमपुर खीरी कडे जात होते. गाडी लॉक झाल्यानंतर गाडी मध्ये रस्त्यातच उभी राहिली आणि पोलीस गाडीतच अडकले.