मायावतींनी पुन्हा भाजपला पाठिंबा देऊन केलं आश्चर्यचकित !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी)  अध्यक्ष मायावती यांनी संसदेत काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत सर्वांना पुन्हा चकित केले आहे. सोमवारी त्यांनी  ट्वीट करून  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा काश्मीर दौऱ्यावर जाण्याचा निणर्य अनुचित आहे म्हणत टीका केली आहे.

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमधील वातावरण सर्वसामान्य होण्यासाठी काही वेळ लागेल. राहुल गांधी  यांनी काश्मीर दौऱ्यावर जाण्याचा चुकीचा निर्णय घेतला त्यामुळे केंद्र आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्याची संधी मिळाली असल्याचा आरोप मायावती यांनी केला.

म्हणून कलम 370 ला समर्थन –

सरकारला पाठिंबा देण्याच्या मायावतींच्या निर्णयामागे वेगळा हेतू आहे का यावर चर्चा सुरु आहे.  कलम  370  हटविण्याच्या सरकारच्या निर्णयाला का पाठिंबा दिला, याविषयी ट्विट करत म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूने होते. ते जम्मू- काश्मीर राज्यासाठी वेगळे कलम  370  ची तरतूद करण्याच्या बाजूने नव्हते. यामुळेच बीएसपीने संसदेत हे कलम हटविण्याचे समर्थन केले.

मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांच्यावर आरोप –

मायावतींचा भाऊ आनंद कुमार याच्यावर बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप आहे. तज्ज्ञांच्या मते भ्रष्टाचाराबाबत सध्या केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अत्यंत कठोर आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारला पाठिंबा देऊन मायावती राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या