CAA निषेध : रिटायर्ड IPS SR दारापुरी आणि सदफ जफर यांच्यासह 14 लोकांना ‘जामीन’ मंजूर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायदा(CAA) विरोधात लखनऊमध्ये झालेल्या आंदोलनानंतर अटक झालेल्या रिटायर्ड आयपीएस एस.आर. दारापुरी, थिएटर कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते सदफ जफर आणि पवन अंबेडकर यांच्यासह 14 लोकांना जामीन मंजूर झाला आहे. लखनऊ ए.डी.जे. संजय शंकर पांडेय यांच्या कोर्टानं सर्व 14 लोकांना 50-50 हजार रुपयांच्या हमीवर जामीन दिला आहे.

जेलमध्ये असणाऱ्या एसआर दारापुरी आणि सदफ जफर यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी लखनऊमध्ये स्कुटीवर प्रवास केला होता. यावेळी प्रियंका यांनी लखनऊ पोलिसांवर अनेक आरोप केले होते.

प्रियंका गांधी जेव्हा सदफ जफर आणि रिटायर्ड आयपीएस एस.आर. दारापुरी यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होत्या तेव्हा पोलिसांनी रस्त्यातच त्यांना ताफा अडवला. ताफा अवडल्यानंतरही प्रियंका गांधी म्हणाल्या की, रस्त्यावर आम्हाला अडवण्यात काही अर्थ नाही. हा एसपीजीचा नाही तर युपी पोलिसांचा मुद्दा आहे. जेव्हा प्रियंका दारापुरी यांच्या नातेवाईकांना भेटायला जात होत्या तेव्हा पोलिसांनी त्यांचा ताफा अडवल्यानंतर त्या पायी चालत दारापुरी यांच्या घरी पोहोचल्या त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पोहोचल्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/