पश्चिम बंगाल निवडणुकीत अखिलेश यादव यांच्याकडून टीएमसीला समर्थन – म्हणाले- ‘टीएमसीचा विजय, तो सपाचा विजय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला (टीएमसी) समर्थन जाहीर केले. अखिलेश यादव म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देत आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीत टीएमसीसाठी प्रचार करतील.

अखिलेश यादव म्हणाले की, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. मी त्याला सांगितले आहे की, बंगालमधील टीएमसीचा विजय हा सपाचा विजय असेल. अखिलेश यादव म्हणाले की, सध्या बंगालमध्ये भाजप आणि त्याचे सहयोगी दडलेले आहेत. निवडणुका संपताच भाजपचे दडलेले सहयोगी युपीमध्ये येतील. पण आता राज्यातील जनता त्यांना धडा शिकवण्यास सज्ज झाली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मालदा जाहीर सभेवर अखिलेश म्हणाले की, ज्या ठिकाणची भाषा त्यांना समजत नाही अशा ठिकाणी ते जात आहे. ते तिथे लव्ह जिहाद कायद्याबद्दल बोलत असतील तर त्यांनी यूपीमध्ये किती लोकांना रोजगार दिला आहे हे देखील सांगायला हवे. सपा सरकारच्या काळातील भरतीचं हे सरकार अद्याप पूर्ण करू शकले नाही.

उत्तर प्रदेशात होतायेत बनावट एन्काउंटर
अखिलेश यादव म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशात बनावट एन्काउंटर घडत आहेत. यादव म्हणाले की, मुख्यमंत्री बंगालमध्ये जाऊन कायदा व सुव्यवस्था याविषयी बोलतात आणि यूपीच्या हाथरसात काय घडले . एका मुलीसमोर वडिलांचा खून झाला आणि सरकार तो सपाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत आहेत. पण तो भाजप कार्यकर्ता आहे. जर गुन्हेगाराचा एन्काउंटर होत असेल तर त्यांच्यापेक्षा मोठा गुन्हेगार कोण आहे. उत्तर प्रदेशला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून सर्वाधिक नोटीस मिळाली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक कस्टोडियल डेथची नोंद आहे.