योगी सरकारचा मुलायम सिंह यादवांना ‘दणका’, ‘लोहिया ट्रस्ट’ घेतलं ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता योगी सरकारने समाजवादी पक्षाच्या लोहिया ट्रस्ट रिकामी केली आहे. राज्य संपत्ती विभागाने ही कारवाई करत कडक सुरक्षेत शनिवारी लोहिया ट्रस्ट ताब्यात घेतली. ही ट्रस्ट सपाच्या मुलायम सिंह यादव यांनी तयार केली होती. याआधी सर्वोच्च न्यायालयाने असे सर्व सरकारी बंगले रिक्त करण्याचा आदेश दिला होता. जे सरकारी खर्चावर चालत होते आणि सरकारकडून देण्यात आले होते. याआधी देखील असे अनेक बंगले रिक्त करण्यात आले होते आणि आता सपाची लोहिया ट्रस्ट देखील ताब्यात घेण्यात आली आहे. 

 
सर्वोच्च न्यायालयाने दिले बंगला रिक्त करण्याचे आदेश –
न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य संपत्ती विभागने उत्तर प्रदेशच्या सहा माजी मुख्यमंत्र्याचे सरकारी बंगले रिक्त करण्याचा आदेश दिले होते.विभागाकडून सर्वांना 15 दिवसाचा अवधी देण्यात आला होता. 
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले रिक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आखिलेश यादव यांना देखील बंगला सोडावा लागला होता. अखिलेश यादव आता पर्यंत अंसल सिटी मध्ये राहत होते. कारण 1 विक्रमादित्य मार्गावर स्थित त्याचे घराचे निर्माण सुरु होते. आता त्यांनी गृह निर्माणानंतर नव्या बंगल्यात प्रवेश केला.

आरोग्यविषयक वृत्त –