सुजीत पांडे लखनऊ तर आलोक सिंह होणार नोएडाचे पहिले पोलिस आयुक्त

लखनऊ/नोएडा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये पोलीस आयुक्त व्यवस्था (Police Commissioner System) लागू करण्याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला मंजूरी मिळताच आता लखनऊ आणि गौतमबुद्ध नगर (नोएडा) मध्ये पोलीस आयुक्तांची नियुक्ती होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज झोनचे एडीजी सुजीत पांडे लखनऊचे पहिले पोलीस आयुक्त होतील. तर मेरठ झोनचे आयजी आलोक सिंह नोएडाचे पोलीस आयुक्त होतील. त्यांची नुकतीच एडीजी पदावर बढती झाली होती. परंतु, अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस आयुक्त व्यवस्था लागू करण्याची माहिती दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश पोलीसांच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस सर्वात महत्वाचा आहे, ज्याच्या सुधारणेसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. ते म्हणाले, जी मागणी सतत केली जात होती, त्या पोलीस आयुक्त व्यवस्थेला कॅबिनेटमध्ये मंजूरी देण्यात आली. लखनऊ आणि नोएडामध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

सीएम योगी म्हणाले, पोलीस यंत्रणा संथ झाल्याने सरकारवर प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे ही व्यवस्था करण्यात आली आहे. 10 लाखांपेक्षा जास्त शहरी क्षेत्रात ही व्यवस्था लागू होणे अपेक्षित होते, पण राजकीय इच्छाशक्ती नसल्याने हे पाऊल कुणी उचलू शकले नव्हते. आमच्या सरकारने ही व्यवस्था लागू केली आहे. गौतम बुद्ध नगरमध्ये 25 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. आता पोलीसांकडे मजिस्ट्रेटचे अधिकार येतील.

पोलीस आयुक्तपदावर एडीजी स्तरावरील अधिकारी

पोलीस आयुक्त म्हणून एडीजी स्तरावरील अधिकारी काम करणार आहे. त्यांच्या सोबत 2 जॉईंट पोलीस कमिश्नर असतील जे आयजी स्तरावरील असतील. यासह 9 एसपी रँकचे अधिकारी असतील. मुख्यमंत्री म्हणाले, एका एसपी रँकच्या महिला पोलीस अधिकार्‍यालाही तैनात करण्यात येणार आहे, ज्यामुळे महिलांशी संबंधीत गुन्हे थांबवता येतील. या महिला अधिकार्‍याला एक अ‍ॅडिशनल रँकची महिला अधिकारी मदत करेल.

पोलीस अधिकार्‍यांची फौज करणार काम

मुख्यमंत्री म्हणाले, वाहतूकीसाठी एसपी आणि एक अ‍ॅडिशनल रँकचा अधिकारीही काम करेल. निर्भया निधीचा विचार करून जेथे सीसीटीव्ही कॅमर्‍यांची आवश्यकता आहे, तेथे ते लावण्यात येतील. गौतमबुद्ध नगरमध्ये एक एडीजी रँक, 2 जॉईंट कमिश्नर, 5 एसपी रँकचे अधिकार, 1 महिला पोलीस अधिकारी काम करतील. एक एसपी रँकचा अधिकारी वाहतूक व्यवस्थेचे काम पाहणार आहे. सोबतच आयुक्त व्यवस्थेअंतर्गत पोलीस ठाणीही तयार केली जातील. कमिश्नरकडे मॅजिस्ट्रेट अधिकारांसह 15 अन्य अधिकार दिले जातील. कोणत्या अधिकार्‍याला कोणते अधिकार द्यावेत हा अधिकारही यामध्ये असणार आहे. या व्यवस्थेमुळे जनतेचा विश्वास वाढेल. उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्यासाठी जे करावे लागेल ते केले जाईल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like