50 लाखाची खंडणी उकळण्याचा प्लॅन फेल झाल्यावर मित्राचा मृतदेह जाळून नाल्यात फेकला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशात आग्रा पोलिसांनी 18 ऑक्टोबरला अपहरण करण्यात आलेल्या धर्मेंद्र तिवारीच्या हत्या प्रकरणी खुलासा केला आहे. या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आले. यात एका आरोपीची आई देखील सहभागी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेचे मुख्य कारण राग आणि 50 लाखाची खंडणी घेऊन कर्जातून सुटका करुन घेणे हे लक्ष होते.

आग्रा ग्राम नागर पोलिस ठाणे निवासी धर्मेंद्र तिवारी 18 ऑक्टोबरला तहसील किरावली परिसरातून आपल्या घरातून निघाला होता परंतू रात्री उशिरापर्यंत तो घरी पोहचला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दाखल केली.

तपासात कळाले की हे प्रकरण अपहरणाचे –
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जेव्हा पाहिले तेव्हा धर्मेंद्र तहसील गेटवरुन बाहेर येताना दिसते. या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी तिला लिफ्ट मागून त्याच्या मागे बसले. ते मिढाकूरपर्यंत जाताना दिसले. या प्रकरणात पोलिसांना आणखी एक व्यक्ती दिसला जो धर्मेंद्र परिसरातून बाहेर येण्यापूर्वी तेथे फिरताना दिसला. यानंतर स्पष्ट झाले की धर्मेंद्र तिवारींचे अपहरण झाले आहे.

या प्रकरणी या संशयित व्यक्तीचे पोस्टर छापण्यात आले होते. या दरम्यान 13 ऑक्टोबरला सहकारी समितीचे कर्मचारी राकेश कुमार यांनी एक संशयितची ओळख आपली मुलगा अरुण उर्फ दिपक आणि दुसऱ्याची ओळख अरुण यांचा मित्र ललित किशोर या रुपात करण्यात आली. यानंतर अरुण आणि ललित किशोर यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. ज्यात त्यांनी अपहरण आणि हत्याची कबूली दिली.

ललित ने सांगितले की तो पहिल्यापासून धर्मेंद्रला ओळखतो. त्या दिवशी जेव्हा तहसीलमधून धर्मेंद्र निघाला तेव्हा त्याला थांबवण्यात आले आणि सांगण्यात आले की पाकीट हरवले आहे आणि घरापर्यंत सोडा. त्याने सांगितले की अपहरणाचा कट त्यांच्या आईने म्हणजेच शालिनीने आखली होती. घरी त्यांनी धर्मेंद्रला कॉफीमध्ये झोपेच्या गाळ्या टाकून त्याला पाजली. त्यानंतर त्याला बांधून बेडच्या खाली टाकण्यात आले. या दरम्यान त्यांचा श्वास कोंडल्या गेल्याने मृत्यू झाला.

त्यानंतर या तिघांनी त्याच्या शरीरावर पेट्रोल ओतून त्याला जाळले आणि 23 ऑक्टोबरला एका कपड्यात बांधून बोदला बिचपुरी रोडवर जुन्या नाल्यात फेकून दिले. यानंतर तिघांना मिळून धर्मेंद्रची मोटार सायकल, लॅपटॉप, बॅग आणि बाकी समान लपवले. पोलिसांनी सांगितले की शालिनीला देखील अटक करण्यात आली आहे.

एसपीने सांगितले की ललित किशोर आणि त्यांच्या आईचे धर्मेंद्र तिवारीचे वडील हरिराम शर्मा यांच्याशी जुने संबंध होते. ललित किशोरचा त्यांच्या पत्नी सलोनीबरोबर घरगुती वाद होते, जे प्रकरण सिंकदरा पोलिसात दाखल आहे. या केसमध्ये ललित किशोरच्या विरोधात वारंट जारी केले होते. धर्मेंद्रचे वडील हरिराम शर्माने ललित किशोरला पकडण्यास त्याच्या पत्नीने सलोनीला सहकार्य केले.

याच प्रकरणावरुन ललित आणि त्याची आई सलोनी राग व्यक्त करायला लागले कारण ललितच्या तुरुंगात जाण्याणे कुटूंबावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यानंतर बेरोजगार ललित, प्रकाश आणि शालिनीने मिळून अपहरणाची योजना आखली आणि 50 लाखाचा खंडणी मागण्याचा कट रचला.

Visit : Policenama.com