CM योगी यांना पुन्हा मिळाली ठार मारण्याची धमकी; FIR दाखल, अल्पवयीन मुलगा ताब्यात

लखनऊ : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देणारा मॅसेज आला आहे. यूपी 112 च्या हेल्पडेस्कच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर धमकीचा हा मॅसेज आला आहे. यावेळी एका अल्पवयीनाने डायल 112 वर मॅसेज केला. ज्यामध्ये योगी यांना धमकी देत अपशब्दांचा वापर केला आहे. माहितीनंतर पोलीस ताबडतोब सक्रिय झाले. गुन्हा दाखल करून आरोपीला काही वेळात सुशांत गोल्फ सिटी ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाइल आणि सीम जप्त केले आहे. पोलीस यासंबंधी चौकशी करत आहेत.

यापूर्वीसुद्धा 21 मे रोजी सीएम योगी यांना ठार मारण्याची धमकी मिळाली होती. ही धमकीसुद्धा यूपी पोलिसांच्या 112 मुख्यालयात एका व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजद्वारे मिळाली होती. यामध्ये लिहिले होते की, सीएम योगीला बॉम्बने मारणार आहे, मुस्लिमांच्या जिवाचा शत्रू आहे तो. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर इन्स्पेक्टर गोमतीनगर यांच्याकडून ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. आयपीसी कलम 505 (1)(ब),506 आणि 507 अंतर्गत केस दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस पथक करत आहे.

कडेकोट बंदोबस्तात राहतात सीएम योगी

सीएम योगी अतिशय कडेकोट बंदोबस्तात राहतात. त्यांच्या सुरक्षेत चोवीस तास कमांडो जवान तैनात राहतात, जेणेकरून कोणताही धोका उत्पन्न होऊ नये. योगी आदित्यनाथ जेव्हा खासदार होते, तेव्हा त्यांची सुरक्षा खूप कडेकोट होती. ते नेहमी विशेष सुरक्षा बंदोबस्तात राहत होते. असे असताना धमकीचा मॅसेज आल्याने हे अतिशय गांभीर्याने घेतले जात आहे.

You might also like