UP चे आरोग्य मंत्री निघाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, म्हणाले – ‘घाबरण्याचे कारण नाही, मी पूर्णपणे ठिक’

लखनऊ : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. आता कोरोनाचा फटका स्वत: राज्याचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांना बसला आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांची प्रकृती गुरूवारी बिघडली, ज्यानंतर कोरोना टेस्ट करण्यात आली होती. सध्या त्यांना 10 दिवसांसाठी घरीच आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर न्यूज 18 शी फोनवर बोलताना आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह म्हणाले की, घाबरण्याचे कारण नाही, मी पूर्णपणे ठिक आहे. ट्रू नेट मशीनमध्ये तपासणी दरम्यान रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या आयसोलेशनमध्ये आहे. कोरोनाला घाबरण्याची नाही तर सल्ल्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. जय प्रताप सिंह यांच्यानुसार त्यांच्यात कोणतेही कोविड लक्षण आढळून आलेले नाहीत.

युपीत आतापर्यंत 1298 मृत्यू
संपूर्ण युपीमध्ये गुरूवारी एकुण 2529 केस समोर आल्या. यासोबतच एकुण कोरोना संक्रमितांची संख्या 58104 झाली आहे. यामध्ये अ‍ॅक्टिव्ह केस 21003 आहेत, तर 33803 रूग्णांना डिस्चार्ज दिला आहे. राज्यात मृतांची एकुण संख्या 1298 वर पोहचली आहे.

पाच दिवसात 300च्या पुढे आकडा
लखनऊमध्ये मागील 5 दिवसात चौथ्यांदा कोरोनाच्या नव्या रूग्णांचा आकडा 300 च्या पुढे गेला आहे. यापूर्वी 16 जुलैला 308 केस समोर आल्या होत्या. तर 19 जुलैला सर्वात जास्त 392 केस आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर 20 जुलैला 282 केस आणि 22 जुलैला 310 केस समोर आल्या. कोविड-19 च्या वाढत्या केसमुळे लखनऊच्या 4 ठाणा क्षेत्रात लॉकडाऊन आहे. लखनऊ जिलाधिकारी अभिषेक प्रकाश यांनी म्हटले की, होम क्वारंटाइन असलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये लक्षणे आढळल्यास 2 तासांच्या आत हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे.