प्रियंका गांधीच्या आरोपांवर UP चे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मांचा ‘पलटवार’, म्हणाले – ‘भगव्या वस्त्रांचं महत्व त्यांना नाही माहित’

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिनेश शर्मा यांनी काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, प्रियांका गांधी हिंदुत्वापासून अपरिचित आहेत. त्यांनी हिंदूंचा अपमान केला आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले की, प्रियंका गांधींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या कपड्याला लक्ष्य केले आहे. त्यांना भगवा कपडा आणि परंपरा माहित नाही. मुख्यमंत्री योगी नेहमीच धर्म पाळतात.

काॅंग्रेस नियमांचे पालन करत नाही –
उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा म्हणाले की, काॅंग्रेस पक्षात नियमांचे पालन न करणे ही परंपरा आहे. माध्यमात रहाण्यासाठी काॅंग्रेस पक्ष नेहमीच नियमांच्या विरुद्ध असतो. भाजप नेते म्हणाले की, आज २०-२० सामने सुरू आहेत. या सामन्यात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि काॅंग्रेस गुंतलेली आहेत. अधिक मते खेचण्यासाठी विरोधकांमध्ये परस्पर संघर्ष सुरू आहे. ते लोक भगवा कलंकित करण्याचे काम करत आहेत.

विरोधकांना राज्यातील शांतता बिघडवायची आहे
विरोधी पक्ष राज्याची शांतता बिघडवण्यासाठी काम करत आहे. कायदा तोडणे हे काॅंग्रेसचे काम आहे. प्रियांका गांधींनी प्रोटोकॉल तोडला असल्याचेही सीआरपीएफने म्हटले आहे. प्रियंका कर्तव्य बजावणार्‍या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर आरोप करीत आहे. याचा निषेध केला पाहिजे.

दरम्यान, प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवा परिधान केला आहे. हा भगवा त्यांचा नाही. भगवा हा भारत आणि हिंदू धर्माच्या अध्यात्मिक संस्कृतीचे प्रतीक आहे. कृष्ण, राम आणि शिव यांच्या देशात हिंसाचार आणि सूड घेण्याबाबत कोणतेही स्थान नाही. महाभारतातही कृष्णा रणांगणात सूड घेण्याविषयी बोलत नव्हते. बदल्याची भावना या देशाची परंपरा नाही. हा देश प्रेम, करुणा आणि अहिंसेबद्दल बोलतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे समजून घेतले पाहिजे, असेही प्रियंका यावेळी म्हणाल्या.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/