महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते 70 वर्षांचे वडील; मुलांनी दोघांना मारले ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एका पुरुष आणि महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जेथे जमीन वादात वडिल व त्यांच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची मुलांनी शॉलने गळा आवळून हत्या केली. या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी मृताच्या मुलासह पाच जणांना अटक केली आहे. पोलिस आता पुढील कारवाई करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लखनऊच्या पोलिस स्टेशन मादियांव येथील सेमरा गौडी गावचे आहे. जेथे राम दयाल (70 वर्षे) शांती देवी नावाच्या महिलेबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रामदयाल याने आपल्या जमीनीचा सौदा केला होता, ज्याची किंमत 50 लाख होती आणि ज्यांतील 11 लाख अडवान्स त्याने घेतला होता.

राम दयाळने त्या 11 लाख पैकी 4 लाख रुपये शांती देवीला दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावर राम दयालची पहिली पत्नी आणि त्यांची मुले संतप्त झाली होती. मृताची मुले वडिलांना समजावण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. संभाषणादरम्यान मृत व्यक्तीसमवेत राहणाऱ्या महिलेने सांगितले की आम्ही सर्व जमीन विकू. हे ऐकून मृताची मुले संतप्त झाली आणि त्यांनी आपल्या वडिलांचा आणि महिलेचा गळा दाबून पळ काढला. मात्र, दुहेरी हत्येची मााहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी मुलासह 5 जणांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त डी. के. ठाकूर म्हणतात की जमीन वादाच्या प्रकरणात मुुल व नातवंडे यांनी एकत्रितपणे वडिलांची आणि कथित सावत्र आईची हत्या केली आहे. त्याचे वडील राम दयाळ हेे शांती देवीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

राम दयाळ आपली 2 एकर जमीन विकत होते, ज्याची किंमत सुमारे 57 लाख आहे. यात 11 लाखांनी आगाऊ रक्कम घेतली होती आणि शांती देवीला चार लाख दिले होते. चर्चेत मुलांबरोबर इतर तीन जणांनी शांती देवी आणि राम दयाल यांची हत्या केली. सध्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.