2020 मधील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री बनले योगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   प्रत्येक वर्षी कीर्तिमान बनणे योगी आदित्यनाथ यांची खासियत आहे. एका वृत्तवाहिनीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आला कि, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोणतीही तोड नाही. 2020 मधील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांसाठी झालेल्या सर्वेक्षणात योगी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. सर्वेक्षणात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बंगालच्या ममता बॅनर्जी, राजस्थानचे अशोक गहलोत आणि मध्यप्रदेशचे शिवराज सिंह चौहान यांच्यावर भारी पडले आहेत. सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे असून योगी यांना मिळालेल्या मतांतही मोठा फरक होता.

योगी सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री

दरम्यान, हे पहिल्यांदाच घडले नाही. काही महिन्यांपूर्वी, फेम इंडिया अहवालात योगी सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या यादीत सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आहेत. आपली प्रामाणिक प्रतिमा, कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि उंच हेतू यामुळे त्यांनी देशातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर राहिले. उदाहरणार्थ, मोदीजी नंतर लोकप्रियतेत फक्त योगीच आहेत.

या यादीमध्ये एकूण आठ मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. टॉप 10 मध्ये केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन सहाव्या आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक दहाव्या क्रमांकावर होते. झारखंडचे हेमंत सोरेन बाराव्या, 13 व्या क्रमांकावर दिल्लीचे अरविंद केजरीवाल, 17 व्या क्रमांकावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, 30 व्या क्रमांकावर गोव्याचे प्रमोद सावंत आणि पंजाबचे अमरिंदर सिंग हे 31 व्या क्रमांकावर होते. विशेष म्हणजे योगी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले आहेत. या पहिल्या टर्ममध्ये ही कामगिरी पूर्ण करणे विशेष आहे. तर नितीशकुमार, नवीन पटनायक, हेमंत सोरेन आणि अमरिंदर सिंह अनेक वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.

योगींच्या नावावर आणखी काही रेकॉर्ड

1998 मध्ये योगी आदित्यनाथ जेव्हा पहिल्यांदा खासदार म्ह्णून निवडून आले तेव्हा ते सर्वात कमी वयाचे खासदार होते. वयाच्या 42 व्या वर्षी त्याच मतदार संघातून सलग 5 वेळा खासदार होण्याचा रेकॉर्ड. मुख्यमंत्री होण्यापूर्वी वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्याच जागेवरुन (गोरखपूर) सलग पाच वेळा निवडून येणारा देशातील एकमेव खासदार. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक क्षेत्रात रेकॉर्ड बनवले आहेत.