गोवंश वाढीला रोखण्यासाठी ‘या’ राज्यात होणार बैलांची नसबंदी, राबवणार मोठं अभियान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांच्या समस्येवर तोडगा म्हणून योगी आदित्यनाथ सरकारकडून आता रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या बैलांचे नसबंदी अभियान राबवले जाणार आहे. हे अभियान मोठ्या स्तरावर राबवण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सर्व जिल्ह्यात रस्त्यावर फिरणाऱ्या बैलांची गणना करण्याची जबाबदारी प्रमुख सचिवांकडे (पशुपालन) सोपवण्यात आली आहे.

गोवंशाच्या होणाऱ्या वाढीवर रोख येण्याची अपेक्षा
एका संशोधनात समोर आले की रस्त्यांवर फिरणाऱ्या बैलांची आणि गायीच्या वासरांच्या जातीच्या दर्जात घसरण होत आहे आणि गोवंशाची संख्या वाढत आहे. या स्थितीने लोक अडचणीत आहेत. अनेक शेतांचे नुकसान झाल्याच्या घटना आहेत. तर अनेक रस्ते अपघाताच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी लोक या रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यांमुळे चिंतेत आहेत.

लखनऊमध्ये असलेल्या 1000 वासरांची होणार नसबंदी
एका माहितीनुसार लखनऊ महापालिकेच्या कान्हा उपवनात पालन करण्यात येत असलेल्या 1000 वासरांची नसबंदी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा वापर उपवनाच्या शेतात शेती करण्यासाठी करण्यात येईल. सरकारच्या मते यामुळे गोवंशाच्या संख्येवर नियंत्रण येईल आणि बैलांच्या जातीत देखील सुधार येईल.

Visit : Policenama.com