भाजपने मंत्रिमंडळातून ‘या’ नेत्याची केली ‘हकालपट्टी’ !

लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा काल शेवटचा टप्पा पार पडला आणि उत्तर प्रदेशातील राजकारणात उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल राम नाईक यांना ओमप्रकाश राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांची ही विनंती राज्यपालांनी मान्य केली आहे. आणि आता त्यांची अखेर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान ओमप्रकाश राजभर यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षावर टीका करताना भाजपाचे उत्तर प्रदेशात पानिपत होईल, असे प्रचारसभांत म्हटले होते. योगी मंत्रिमंडळात राजभर मागस वर्ग विकास आणि दिव्यांग विकास मंत्री होते.यावेळी ओमप्रकाश राजभर यांनी हा न निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. योगी यांनी हा निर्णय २० दिवस आगोदरच घ्यायला हवा होता, असंदेखील ते यावेळी म्हणाले. राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला भाजपने लोकसभा निवडणुकीत एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या सुहेलदेव यांनी उत्तर प्रदेशात ३६ ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते.

दरम्यान, प्रचारावेळी त्यांनी भाजपाला मोठ्या प्रमाणात शिवीगाळ देखील केली होती. यावरून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता २३ तारखेला निकालानंतर राजभर यांचा परिणाम उत्तर प्रदेशात किती जाणवला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राजभर यांनी महिनाभर आधीच आपल्या पदाच राजीनामा दिला होता मात्र योगी आदित्यनाथ यांनी तो स्वीकारला नव्हता.

You might also like