Coronavirus : पोलिस दादा काळजी घ्या ! ‘कोरोना’मुळं ‘इथं’ झाला सहाय्यक पोलिस आयुक्तांचा मृत्यू

लुधियाना : वृत्तसंस्था – देशात कोरोनामुळे हाहाकार माजवला आहे. देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. पंजाबमध्ये कोरोना विषाणूमुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.18) लुधियाना उत्तरचे सहायक पोलीस आयुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर एसपीएस रुग्णालयात उपचार सुरु होते. सिव्हिल सर्जन यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृत 52 वर्षीय पोलीस अधिकारी मागील काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

सहायक पोलीस आयुक्त अनिल कोहली यांच्यावर प्लाझ्मा थेपीद्वारे उपचार करण्याची तयारी सुरु केली होती. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी झाली असती तर पंजाबमधील ही पहिलीच घटना असली असती. अनिल कोहली यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने देखील मान्यता दिली होती. अनिल कोहली यांच्यावर एसपीएस रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या उपचारासाठी आरोग्य विभागाने संभाव्य प्लाझ्मा रक्तदात्याच्या शोधात होते.

यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे असे सांगण्यात आले होते की, प्लाझ्मा थेरपीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. राज्य सरकारचे आरोग्य सल्लागार आणि पीजीआयचे माजी संचालक डॉ. केके तळवाड हे या थेरपीचे सर्व व्यवस्थापन पाहत होते. डॉ. तळवाड यांच्या विनंतीवरून पीजीआयच्या रक्त संक्रमण विभागाचे माजी प्रमुख डॉ. निलम मारहवाह यांनी प्लाझ्मा थेरपीमध्ये मदत करण्यासाठी सहमती दर्शवली होती. या दरम्यान अनिल कोहली यांच्या संपर्कात आलेल्या तिघांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये पत्नी पलक कोहली, त्यांचा चालक कॉनस्टेबल प्रभुजोत सिंग आणि अनिल कोहली यांची चाचणी घेण्यात आली.