Lumpy Skin Disease | ‘मोदींनी नायजेरियातून आलेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अजिब आणि हास्यास्पद दावा

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशात लम्पी आजाराने (Lumpy Skin Disease) थैमान घातले आहे. गाईंसह अनेक जनावरे लम्पी आजाराच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी चिंतेत आहे. जनावरांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) करुन हा लम्पी (Lumpy Skin Disease) आजार नियंत्रणात आणला आहे. त्यातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (Maharashtra Pradesh Congress Committee President) नाना पटोले (Nana Patole) यांनी लम्पी आजाराबाबत अजब आणि हास्यास्पद दावा केला आहे.

 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, लम्पी हा आजार (Lumpy Skin Disease) नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही (Cheetah) नायजेरियातून (Nigeria) आणले आहेत. चित्त्याच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने (Modi Government) जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले, असे नाना पटोले म्हणाले.

 

हा मोदींचा एक कट आहे. चित्ते नाही तर विदेशातील आजारच मोदींनी देशात आणल्याचा हस्यास्पद दावा पटोले यांनी केला आहे. आतापर्यंत 2 हजार वर्षापासुन देशात जनावरांमध्ये लम्पी रोग नव्हता. नायजेरिया मधून हा लम्पी रोग आलाय. नायजेरियामधून चित्ते आणल्यामुळे काय फायदा झाला? रोजगार मिळाला का? यातून विदेशी आजार आणुन शेतकऱ्यांना बरबाद करण्याचं काम होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

नामिबियातून भारतात 8 चित्ते
भारतात चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सात दशकांहून अधिक काळ देशातून नामशेष झालेल्या या विशिष्ट प्रजातीचे पुनरागमन झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात आठ चित्ते आणण्यात आले.
नामिबियातून आणलेल्या या चित्त्यांना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात (Kuno-Palpur National Park) ठेवण्यात आलं आहे.

 

Web Title :- Lumpy Skin Disease | lampi virus spread after modi government introduced cheetah in india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची मोठी घोषणा, लढणार की शिवसेनेला पाठिंबा? केले स्पष्ट

Dasra Melava 2022 | पुण्यात युवासेनेने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ; मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात, काळ…

CM Eknath Shinde | अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी 55 पैकी 40 आमदार आमच्यासोबत : एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली आपली ताकद

Chandrakant Patil | ‘नाथाभाऊंचे जाणे दु:खद होते, पण आता…’, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगतिलं