Lumpy Virus | पिंपरी चिंचवड शहरी भागात लम्पीचा शिरकाव, पाच जनावरांना प्रादुर्भाव; आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आढावा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव (Lumpy Virus) ग्रामीण भागाच्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad City) कमी आहे, शहरात गायवंशीय प्राण्यांची संख्या 3 हजार पाचशे असून आतापर्यंत 5 लम्पी विषाणू बाधित जनावरे (Lumpy Virus) आढळले आहेत. त्यामुळे लम्पीचा शहरात शिरकाव झाला असून आयुक्त शेखर सिंह (Commissioner Shekhar Singh) यांनी शहरातील उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.

 

लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव (Lumpy Virus) रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पशूवैद्यकीय विभागामार्फत (Veterinary Department) सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत निर्जंतुकीकरण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाच्या सहकार्याने युद्धपातळीवर लसीकरण (Vaccination) करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करून लसीकरण अधिक गतिमान करण्यात यावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिले.

 

शहरात ज्या ठिकाणी लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळले आहेत तेथील 5 किलो मीटर परिसरात लसीकरण प्राधान्याने व जलदगतीने करण्यात येत आहे.
मानवाला लम्पी या विषाणूपासून धोका नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
तसेच शेळ्या, मेंढ्या इतर पाळीव प्राण्यांनाही या विषाणूपासून धोका नाही.
गोठे, गोशाळा याठिकाणी स्वच्छतेबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी,
तसेच लम्पी विषाणूबाबत चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती
पशुवैद्यकीय विभागाचे उप आयुक्त सचिन ढोले (Deputy Commissioner Sachin Dhole) यांनी दिली.

 

Web Title :- Lumpy Virus | Lumpy infestation in Pimpri Chinchwad urban area, five animals infected

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | पेंग्विन आणल्याने राज्याचा विकास होतो का?, अजित पवारांच्या प्रश्नाला बावनकुळेंचा रोखठोक सवाल

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’