3 तास राहिलं चंद्र ग्रहण, जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांवर होईल परिणाम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – यावर्षातील दुसरे चंद्र ग्रहण संपले आहे. हे एक उपछाया ग्रहण होते, जे रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होऊन 6 जूनरोजी 2 वाजून 34 मिनिटांनी संपले. या चंद्र ग्रहणाचा आपल्या जीवनावर कोणता प्रभाव पडणार आणि कोणत्या राशीचे लोक या ग्रहणाने जास्त प्रभावित होणार ते जाणून घेवूयात.

हे उपछाया ग्रहण वृश्चिक राशीत लागले होते. वृश्चिक राशीत अष्टम भावात राहु गोचर करत आहे. राहुला संसर्ग, रोग आणि आजारााचा कारक ग्रह मानले गेले आहे. राहु राशीतून अष्टम भावात आपला प्रभाव दाखवू शकत नाही आणि दुषित अवस्थेमध्ये जातो. या ग्रहणकाळात सुद्धा राहु आपला चांगला प्रभाव दाखवू शकणार नाही, ज्यामुळे लोकांना काही ना काही समस्या जाणवत राहतील.

वृश्चिक राशीत ग्रहण लागण्याने या राशीच्या लोकांवर चंद्र ग्रहाणाचा जास्त प्रभाव होईल. या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना या ग्रहणात विशेरू सावधानता बाळगावी लागेल.

ग्रहणकाळात भगवान शंकरांच्या चालीसाचे पठन करावे आणि ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा. तुम्ही जेवढी भगवान शंकराची पूजा कराल तेवढा लाभ होईल. याशिवाय आपल्या मातेचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या.

चंद्र हा मनाचा कारक आहे, यासाठी तो जव्हा ग्रासित असतो तेव्हा लोकांच्या मनात नकारात्मक विचार जरूर येतात. ग्रहणकाळात प्रत्येकाला चंद्र बलवान करण्याची गरज असते. यामुळे मनावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. स्वत:ला शुद्ध आणि पवित्र ठेवा. ग्रहणकाळात लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवा.

यावर्षी कधी लागणार ग्रहण

या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण 10 जानेवारीला 2020 रोजी झाले आहे. दूसरे चंद्रग्रहण 5 जून म्हणजे काल रात्री लागले होते. हे एक उपछाया ग्रहण होते जे भारतासह आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये दिसले.

याच्या 15 दिवसानंतर म्हणजे 21 जूनरोजी तिसरे सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतासह सौदी, साउथ-ईस्ट आणि आशियामध्ये पूर्णपणे दिसेल.

यानंतर तिसरे चंद्रग्रहण 5 जुलैरोजी लागेल. ते भारतातून दिसणार नाही. ते साउथ ईस्टसह अफ्रिका आणि अमेरिकेतून दिसेल.

चंद्रग्रहण बघणे सुरक्षित आहे का ?

सूर्यग्रहणाविरूद्ध चंद्र ग्रहणाची घटना उघड्या डोळ्यांनी पाहू शकता येते. यामुळे डोळ्यांवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. संशोधकांनुसार 2020 मध्ये रात्री चंद्र ग्रहण सहज पाहता येईल, कारण रात्री कोणतीही हानिकारक किरणे वातावरणात नसतात.

चंद्र ग्रहण पाहण्यासाठी डोळ्यांवर चष्मा लावण्याची गरज नसते. परंतु, गरोदर महिलांना सल्ला दिला जातो की, चंद्र ग्रहणा दम्यान घराबाहेर पडू नये.