‘राज्यभरात फक्त 10 रुपयांत देणार जेवणाची थाळी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. आज दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या घोषणेत आश्वासने दिली आहेत की संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 10 रुपयांमध्ये चांगल्या जेवणाची थाळी उपलब्ध करुन देण्यात येईल. 300 युनिटपर्यंतचा विजेचा दर 30 टक्क्यांनी कपात करण्यात येईल आणि सदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी 1 रुपयात गावोगावी आरोग्य चाचणी केंद्रे उभारण्यात येतील असे सांगत आज शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी घोषणांची खिरापत वाटली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिवसेना बस सेवा देखील देणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा दसरा मेळावा पार पडला. ही संधी साधत शिवसेनेकडून दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आज दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करत विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मी निघालो असल्याची गर्जना केली.

यंदाची विजयादशमी शिवसेनेसाठी महत्वाची आहे. कारण आजच्या विजया दशमीला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला, आता निवडणूका पार पडल्यावर शिवसेना आपला दुसरा विजय कसा साजरा करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

यावर बोलताना उद्धव ठाकरे विश्वास दर्शवला की, असा क्वचितच योग येतो. या एकाच महिन्यात दोन विजयादशमी आहेत. आज पहिली विजयादशमी आहे आणि दुसरी येत्या २४ तारखेला निवडणुकीच्या निकालाने साजरी होणार आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com