’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर, जाणून घ्या 9 ‘लक्षणं’ आणि बचावाचे ‘उपाय’

काही दिवसांपूर्वीच बॉलीवुड अभिनेता संजय दत्तला फुफ्फसांचा कॅन्सर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. संज दत्त थर्ड स्टेजचा एडव्हान्स कॅन्सर झाला आहे. फुफ्फुसांचा कॅन्सर जीवघेणा असून यामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. फुफ्फुसांच्या कॅन्सरचे स्मॉल सेल लंग्स कॅन्सर आणि नॉन स्मॉल सेल लंग्स कॅन्सर असे दोन प्रकार आहेत. यातील स्मॉल सेल लंग्स कॅन्सर हा खूप गंभीर असतो. हा आजार का होतो, त्याची कारणे, उपाय जाणून घेवूयात…

ही आहेत कारणं
1 तंबाखू, सिगारेट अशा मादक पदार्थांचे रोज जास्त प्रमाणात सेवन
2 गाड्यांमधून, फॅक्ट्रीजमधून बाहेर येत असलेल्या धुरात बेंजीन गॅस.
3 अनुवांशिकतेमुळे हा आजार उद्भवण्याची शक्यता असते.
4 जीन्समधील बदलांमुळे हा जीवघेणा आजार उद्भवतो.

Advt.

ही आहेत लक्षणं

1 तीन आठवड्यांपेक्षा जास्तकाळ खोकला येणे, लवकर बरा न होणे
2 छातीत वेदना
3 चालताना, शिड्या चढताना उतरताना दम लागणे
4 खोकल्यातून रक्त बाहेर येणे
5 वजन वेगाने कमी होणे.
6 श्वास घेण्यास अडचण होणे
7 सतत कफची समस्या होणे
8 हाडे आणि जॉइंट्समध्ये वेदना होणे
9 जास्त थकवा आणि कमजोरी जाणवणे

अशी घ्या काळजी
* तंबाखू, सिगारेटची सवय सोडण्यासाठी स्वत:ला कामात व्यस्त ठेवा.
* लोकांसोबत वेळ घालवा
* सतत पाणी प्या, टीव्ही बघा.
* अश्वगंधा सिगरेट पिण्याची इच्छा कमी करण्यासाठी मदत करतं.
* नाश्त्यामध्ये एक ग्लास दूधामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर एकत्र करून प्यायल्याने धुम्रपान करण्याची इच्छा कमी होते.
* दररोज व्यायाम करा.