Lung Fibrosis | कोरोना व्हायरसच्या हल्ल्याने खराब झालेली फुफ्फुसे 3 महिन्यात होताहेत ठिक : स्टडी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरस (Corona Virus) सामान्यपणे रूग्णांच्या फुफ्फुसावर हल्ला करतो. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान आपण पाहिले होते की, व्हायरसच्या हल्ल्याने अनेक रूग्णांची फुफ्फुसे 90 टक्केपर्यंत खराब झाली होती. यामुळे डॉक्टरांना ही भीती वाटत होती की या फुफ्फुसांमध्ये फायब्रोसिस (Lung Fibrosis) नावाचा आजार होऊ शकतो. सामान्यपणे आजारांमध्ये फुफ्फुसाचे टिशू खराब होतात आणि फुफ्फुसे काम करणे बंद (Lung Fibrosis) करतात. परंतु एका स्टडीत समजले आहे की, कोरोनाचे ते रूग्ण ज्यांची फुफ्फुसे खराब झाली होती ती 3 महिन्यात ठिक होत आहेत.

टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर सुमित सिंघानिया यांनी सांगितले की, स्टडीमध्ये समजले आहे की, बहुतांश रूग्णांची फुफ्फुसे चांगली होत आहेत. या स्टडीचे सुरूवातीचे निष्कर्ष ’लंग इंडिया जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

चांगली होत आहेत खराब फुफ्फुसे
डॉक्टर सुमित सिंघानिया यांनी सांगितले की हा स्टडी कोरोनाच्या त्या रूग्णांवर केला गेला ज्यांची फुफ्फुसे खुप खराब झाली होती. त्यांनी म्हटले की, तीन महिन्यानंतर बहुतांश रूग्णांच्या फुफ्फुसाचा आकार आणि काम करण्याची पद्धत खुप चांगली झाली आहे. सर्व रूग्णांची लंग फंक्शन टेस्ट आणि सीटी स्कॅन करण्यात आले.

 

अशा रूग्णांवर ठेवले लक्ष

हा स्टडी कोरोनाच्या त्या 42 रूग्णांवर करण्यात आला ज्यांना अँटीव्हायरल रेमडेसिवीर इंजेक्शन आणि स्टेरॉईड देण्यात आले होते.
या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
सोबतच धोकादायक स्तरावरील निमोनिया सुद्धा झाला होता.
आतापर्यंत या स्टडीच्या अंतर्गत 300 लोकांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
काही लोकांवर कोरोना झाल्यानंतर एक वर्षापर्यंत लक्ष ठेवण्यात आले.
कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना लंग फायब्रोसिसचे औषध सुद्धा घेण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title :- Lung Fibrosis | coronavirus hit lungs heal in 3 months says study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही